How to decorate the house for Ganesha: गणेश चतुर्थी जवळ येताच बाप्पाचे भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्याची तयारी सुरू करतात. यावर्षी गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. यावेळी तुम्ही विचार केला असेल की, बाप्पाचे मोठ्या थाटामाटात घरी स्वागत कराल. त्यामुळे त्यांची आरासही खासच असायला हवी. मग घराचं डेकोरेशन असो किंवा श्रीगणेशाला विराजमान करायची आरास असो सर्वकाही आकर्षक आणि सुंदर असायला हवं. यासाठी तुम्ही नवनवीन डिझाइन्स इंटरनेटवर सर्च करत आहात. तर मग या सजावटीच्या कल्पना तुम्हाला खूप मदत करणार आहेत. घरात किंवा मंदिरात कोणत्याही ठिकाणी अशी सजावट करून बाप्पाला प्रसन्न करू शकता. शिवाय स्वतःच्या हाताने लाडक्या गणरायासाठी आरास बनवणे तुम्हाला आनंदायकसुद्धा वाटेल.
तसं पाहायला गेलं तर, काचेच्या मणी बाजारात सहज उपलब्ध होतात. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पांढऱ्या रिबनवर काचेचे छोटे तुकडे चिकटवून स्वतः माळ बनवू शकता. असे केल्यास ते खूपच सुंदर दिसेल. या माळ एक एक करून मंदिराच्या प्रवेशद्वारावर किंवा गणेश मूर्तीच्या मागे चिकटवा.
ज्या भिंतीजवळ गणेशमूर्ती बसवायची आहे. त्याच्या मागे दोरीवर फुलांची माळ गुंडाळा आणि शेवटी एक घंटा लटकवा. बनावट प्लास्टिकच्या घंटा बाजारात अगदी सहज मिळतात. या प्रकारचा बॅकग्रांउड खूपच आकर्षक दिसतो. तुम्हाला हवे असल्यास मंदिराच्या प्रवेशद्वारावर कमानीची रचनाही तुम्ही बसवू शकता. ज्यामध्ये लहान फुलांच्या माळांसह घंटा लटकलेल्या असतात.
गणपतीच्या डेकोरेशनला आणखी खास आणि आकर्षक बनवण्यासाठी मंदिर विविध रंगांच्या दिव्यांनी सजवा. यावेळी दिवे अतिशय सुंदर दिसतात आणि संपूर्ण मंदिर उजळून निघते. यासाठी तुम्ही कृत्रिम लाइटिंग किंवा खरोखरचे दिवेसुद्धा वापरू शकता.
गणेशमूर्तीच्या मागे कागदाची फुले, पिनव्हील आणि फ्रेम ठेवा. बाप्पाच्या मागील बॅकग्राउंड बनविण्यासाठी, पांढरा रंगाचा मोठा तक्ता किंवा कागद वापरा. त्यामुळे मंदिर सुंदर दिसेल. आणि श्रीगणेशाची मूर्ती आणखीनच उठून दिसेल.
गणेशोत्सवात सजावट करताना तुम्हाला हवे असल्यास, लांब स्ट्रिंग्ससारख्या रंगीबेरंगी फितीसुद्धा तुम्ही लटकवू शकता. त्यामध्ये फुले व लाइटिंगही घाला. अशा प्रकारे सजावट केल्याने तुमचे मंदिर रंगीबेरंगी आणि सुंदर होईल. विशेष म्हणजे कमी खर्चात अतिशय सुंदर डेकोरेशन केल्याचं समाधान मिळेल.