Ganesh Chaturthi: बाप्पाला अर्पण केला जाणार दुर्वा धार्मिकच नव्हे आरोग्याच्यादृष्टीनेही महत्वाचा, फायदे वाचून व्हाल अवाक-ganesh chaturthi 2024 bappas beloved durva plant has medicinal properties ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ganesh Chaturthi: बाप्पाला अर्पण केला जाणार दुर्वा धार्मिकच नव्हे आरोग्याच्यादृष्टीनेही महत्वाचा, फायदे वाचून व्हाल अवाक

Ganesh Chaturthi: बाप्पाला अर्पण केला जाणार दुर्वा धार्मिकच नव्हे आरोग्याच्यादृष्टीनेही महत्वाचा, फायदे वाचून व्हाल अवाक

Sep 06, 2024 11:09 AM IST

Medicinal properties of Durva plant: गणेश उत्सवात श्रीगणेशाच्या संबंधित सर्वच गोष्टींना विशेष महत्व असते. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे दुर्वा होय. भारतात गवतासारख्या दिसणाऱ्या दुर्वा या वनस्पतीला अत्यंत पवित्र मानले जाते.

दुर्वा धार्मिकच नव्हे आरोग्याच्यादृष्टीनेही महत्वाचा
दुर्वा धार्मिकच नव्हे आरोग्याच्यादृष्टीनेही महत्वाचा

Durva is useful for which diseases:  ७ सप्टेंबर अर्थातच उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. बाप्पा थाटामाटात उद्या सर्वांच्या घरी विराजमान होणार आहेत. बाप्पाच्या आगमनाची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. गणेश उत्सवात श्रीगणेशाच्या संबंधित सर्वच गोष्टींना विशेष महत्व असते. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे दुर्वा होय. भारतात गवतासारख्या दिसणाऱ्या दुर्वा या वनस्पतीला अत्यंत पवित्र मानले जाते. श्री गणेशाच्या पूजेमध्ये याचा विशेष उपयोग होतो. परंतु आयुर्वेदात दुर्वा एक शक्तिशाली औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते. आज आपण दुर्वाचे औषधीय गुणधर्म जाणून घेणार आहोत.

मधुमेहामध्ये फायदेशीर-

दुर्वा या वनस्पतीमध्ये सायनोडॉन डॅक्टाइलोन नावाचे संयुग असते. त्याचा हायपोग्लाइसेमिक प्रभाव आहे. जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. दुर्वाचा रस कडुलिंबाच्या रसासोबत सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास मधुमेहाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. हे इन्सुलिन स्पाइक रोखण्यासाठीदेखील उपयुक्त ठरू शकते.

वजन घटवण्यास फायदेशीर-

तज्ज्ञांच्या मते, दुर्वा वनस्पती वजन कमी करण्यात खूप मदत करू शकते. यासाठी दुर्वा, एक चमचा जिरे, ४-५ काळी मिरी आणि थोडी दालचिनी घालून बारीक करून घ्या. नंतर ते गाळून ताक किंवा नारळाच्या पाण्यासोबत दिवसातून दोनदा सेवन करा. याच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा आटोक्यात ठेवण्यास मदत होईल.

त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यास उपयुक्त-

दुर्वा या वनस्पतीमध्ये अँटी इंफ्लीमेन्टरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या जसे की खाज सुटणे, जळजळ होणे आणि पुरळ उठणे इत्यादी दूर करण्यात ते प्रभावी ठरतात. एक्जिमा, सोरायसिस आणि बुरशीजन्य संसर्गावर उपचार करण्यासाठीदेखील दुर्वाचा वापर खूप फायदेशीर आहे. यासाठी दूर्वाच्या रसात चिमूटभर हळद मिसळून त्या-त्या भागावर लावा. अशाने तुम्हाला आराम मिळेल.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत-

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी, मजबूत रोगप्रतिकारशक्ती असणे खूप महत्वाचे आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दुर्वा वनस्पतीचा वापर करता येतो. यात अँटी-व्हायरल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे संक्रमणाशी लढण्यास मदत करतात.

बद्धकोष्ठतेपासून आराम-

दुर्वा वनस्पती पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्याचा रस रिकाम्या पोटी सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. याच्या नियमित सेवनाने मल शरीराबाहेर जाणे सोपे होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)