Boy names associated with lord ganesh: हिंदू धर्मात सर्व देवांमध्ये श्रीगणेशाला विशेष स्थान देण्यात आले आहे. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी श्रीगणेशाचे नाव घेतले जाते. अडथळा दूर करणाऱ्या बाप्पाच्या फक्त नावानेच सर्व अडचणी दूर होतात, असे घरातील ज्येष्ठांचे मत आहे. आपल्या देशात मुलाचे नाव देवाच्या नावावर ठेवणे खूप सामान्य आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे याकाळात जन्मलेल्या मुलांची तुम्ही गणपतीच्या नावावर ठेवू शकता.
आपल्या लाडक्या बाप्पाचे नाव निवडताना लोक पारंपारिक किंवा संस्कृत भाषेतून नाव निवडणे पसंत करतात. तर काही लोक अद्ययावत आणि अद्वितीय नावाला प्राधान्य देतात. आपल्याला अशी नावे शोधण्याची आवश्यकता नाही कारण आमच्याकडे नावांची यादी आहे ज्यावरून आपण मुलासाठी भगवान गणेशाशी संबंधित नावे पाहू शकता. तर वेळ न घालवता लगेच पाहा बाळाच्या नावाची सुंदर यादी...
श्रीगणेशाच्या नावावरून बाळाची नावे-
१) आराध्य- देवाची कृपा
२) अथेश- भगवान गणेश
३) अनिक- तेजस्वी
४) अथर्व- सर्व संकटांशी लढणारा देव
५) अवनीश- स्वामी
६) अमोघ- लाभदायक
७) अवनेश- भगवान गणेश
८) गजदंत- हत्तीचे दात
९) गौरीक- भगवान गणेश
१०) परिण- भगवान गणेश
बाप्पाच्या नावावरून आणखी काही बाळाची नावे
११) प्रथमेश- सर्व देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ
१२) परिण- देव गणेश
१३) इभान - हत्तीचे मुख असलेला देव
१४) रिद्वेश- सर्व लोकांच्या अंतःकरणात निवास करणारा देव
१५) सर्वत्मन- विश्वाचा रक्षक
१६) तक्ष- बलवान किंवा कबुतराचा डोळा
१८) शुभम- शुभ
१९) रिद्धेश - शांती देवता
२०) विकट- अप्रतिम व्यक्तिमत्त्व असलेल्या देवाचे दुसरे नाव