Kesar Mawa Modak Recipe: १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून १० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला सुरुवात होते. बहुतांश घरी गणेशोत्सवात बाप्पाला घरी आणले जाते. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र जोमाने सुरु आहे. या दहा दिवसाच्या उत्सवात बाप्पाला विविध वस्तूंचे नैवेद्य दाखवला जातो. या काळात लोक बाप्पाचे आवडते मोदक आवर्जुन बनवतात. यात तुम्ही खव्याच्या मोदकची ही रेसिपी ट्राय करू शकता. केसर माव्याचे मोदक बनवण्याची रेसिपी जाणून घ्या.
- खवा
- साखर
- पिस्ता
- वेलची पावडर
- केशर
- दूध
केसर माव्याचे मोदक बनवण्यासाठी एका भांड्यात दूध आणि साखर एकत्र करून बाजूला ठेवा. आता एका नॉन-स्टिक पॅनमध्ये खवा ३ ते ४ मिनिटे भाजून घ्या. मध्ये मध्ये ढवळत राहा. भाजल्यावर त्यात केशर दूध घालून मध्यम आचेवर २ मिनिटे राहू द्या. माव्याचे मिश्रण नीट मिक्स करून प्लेटमध्ये काढून घ्या. आता हे मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हाताने मॅश करा. त्यात बारीक केलेली साखर, वेलची पावडर आणि पिस्ता घाला. नीट मिक्स केल्यानंतर मोदक बनवण्यासाठी साचा घ्या आणि त्यात तूप लावा. आता त्यात मावा भरून नीट दाबून घ्या. मोदक साच्यातून काढा. सर्व माव्याचे मोदक त्याच पद्धतीने तयार करा. तुमचे केसर मावा मोदक तयार आहे.
संबंधित बातम्या