Mahatma Gandhi Motivational Quotes in Marathi: २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असते. बापूंनी नेहमीच लोकांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. बापूंचे हे विचार केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शन करत आले आहेत आणि यापुढेही करत राहतील. या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील साजरा केला जातो. १५ जून २००७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने महात्मा गांधी यांच्या सन्मानार्थ २ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला. गांधी जयंतीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र- मैत्रिणी आणि प्रियजनांना बापूंचे हे प्रेरणादायी विचार, शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता
याची शिकवण देणाऱ्या
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना
विनम्र अभिवादन!
मझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे
सत्य माझा परमेश्वर आणि
अहिंसा त्याला प्राप्त करण्याचे साधन आहे...
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्याचा प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस म्हणून जगा
आणि असं शिका की तुम्ही अमर राहणार आहात.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे.
सत्य हा माझा देव आहे आणि
अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे...
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्या दिवशी एक महिला रात्री रस्त्यावर एकट्याने फिरू शकेल,
त्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणू शकतो...
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा
तुमचा 'स्व' तुम्हाला सापडेल
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
अहिंसा ही मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे.
हे जगातील कोणत्याही हत्यारापेक्षा अधिक ताकदवान आहे.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील,
नंतर तुमच्यावर हसतील
नंतर भांडतीलही
पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल...
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही जे काम कराल ते महत्त्वाचं असू शकतं,
पण तुम्ही काहीतरी काम करणं,
हे सर्वात महत्त्वाचं असतं...
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
एखादी व्यक्ती आपल्या विचारांनी निर्माण केलेला एक प्राणी आहे,
तो जे काही विचार करत असतो तसे तो बनत असतो.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्राशी मैत्री करणे सोपे आहे.
पण तुम्ही ज्याला शत्रू समजता
त्याच्याशी मैत्री करणे म्हणजे
खऱ्या धर्माचे सार आहे.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
चांगल्या बदलाची सुरुवात
आधी स्वतःपासून करा
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!