Gandhi Jayanti 2024 : आयुष्यातील कठीण प्रसंगी महात्मा गांधींचे 'हे' विचार करतील मदत, एकदा तरी वाचाच
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Gandhi Jayanti 2024 : आयुष्यातील कठीण प्रसंगी महात्मा गांधींचे 'हे' विचार करतील मदत, एकदा तरी वाचाच

Gandhi Jayanti 2024 : आयुष्यातील कठीण प्रसंगी महात्मा गांधींचे 'हे' विचार करतील मदत, एकदा तरी वाचाच

Published Oct 02, 2024 09:05 AM IST

Mahatma Gandhi Thoughts: गांधीजींनी काय केले हे जाणून घेण्याबरोबरच गांधीजींचे विचार काय होते हेही समजून घेणे गरजेचे आहे.

Gandhi jayanti 2024
Gandhi jayanti 2024 (freepik)

Mahatma Gandhi Marathi Quotes: महात्मा गांधींना कोण ओळखत नाही? देशातील प्रत्येक मुलाला गांधीजींचे नाव माहीत आहे. त्यांच्या चित्रावरून लहान मुले त्यांना ओळखतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, गांधीजींना ओळखणे का महत्त्वाचे आहे? अगदी बालवाडीपासूनच मुलांना महात्मा गांधींबद्दल का सांगितले जाते? गांधीजींनी काय केले हे जाणून घेण्याबरोबरच गांधीजींचे विचार काय होते हेही समजून घेणे गरजेचे आहे. कारण त्यांचे विचार त्यांच्या कृती मागे राहिले. गांधीजींनी शतकापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आपण अंगिकारल्या तर आजही जीवन सुखद आणि यशस्वी होईल. आज गांधीजींच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचे सुंदर विचार घेऊया...

 

  • महात्मा गांधींचे सुंदर विचार-

-"एखाद्या देशाची महानता आणि त्याची नैतिक प्रगती तेथील प्राण्यांना कशी वागणूक दिली जाते यावरून ठरवता येते." - महात्मा गांधी

 

-"आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग तुमच्यावर हसतील, मग तुमच्याशी लढतील आणि मग तुम्ही जिंकाल." - महात्मा गांधी

 

-"मला वाटते नेतृत्व म्हणजे लोकांसोबत चालणे." - महात्मा गांधी

 

-"विश्वास नेहमी तर्काच्या विरुद्ध तोलला पाहिजे. जेव्हा विश्वास आंधळा होतो तेव्हा तो मरतो." - महात्मा गांधी

 

-"जोपर्यंत तुम्ही त्यांना गमावत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी कोण महत्वाचे आहे हे तुम्हाला समजत नाही." - महात्मा गांधी

 

-"तुम्ही या जगात बदल पाहू इच्छित असाल तर आधी स्वतःमध्ये बदल करा." - महात्मा गांधी

 

-"दुर्बल कधीही माफ करू शकत नाही, क्षमा हा बलवानाचा गुण आहे."- महात्मा गांधी

-"अशा स्वातंत्र्याला काही अर्थ नाही जर त्यात चुका करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट नसेल." - महात्मा गांधी

 

-"उद्या मरणार असल्यासारखे जगा, आणि चिरकाल जगायचे आहे असे शिका." - महात्मा गांधी

 

-"तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय बोलता आणि तुम्ही काय करता यात एकवाक्यता असेल तेव्हाच आनंद मिळेल." - महात्मा गांधी

 

-कोणत्याही स्वाभिमानी व्यक्तीसाठी, सोन्याच्या साखळ्या लोखंडी साखळ्यांपेक्षा कमी कठोर नसतील. टोचणे धातूमध्ये नसून बेड्यांमध्ये असते.- महात्मा गांधी

 

-स्वातंत्र्य जन्मासारखे आहे. जोपर्यंत आपण पूर्णपणे स्वतंत्र होत नाही तोपर्यंत आपण परावलंबी राहू.-महात्मा गांधी

 

-वादळावर मात करायची असेल तर अधिक जोखीम पत्करून पूर्ण ताकदीने पुढे जावे लागेल.-महात्मा गांधी

 

Whats_app_banner