Side Effects Of Frozen Peas: सध्याचे जग हे धावपळीचे जग आहे असे म्हटले जाते. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःची प्रगती करण्यामध्ये व्यग्र आहे. यासाठी तो दररोज विविध स्पर्धकांना तोंड देत असतो. अशा स्थितीत सर्वांवरच कामाचा अतिरिक्त ताण वाढतो. त्यामुळे ऑफिसमधील काम करून घरातील काम करण्याची शक्ती कोणताच उरत नाही. शिवाय बदलत्या जीवनशैलीनुसार अनेक महिलांना कामाचा कंटाळा असतो. त्यामुळे त्या अनेक सोप्या मार्गांचा अवलंब करतात. मात्र हे सोपे मार्ग कधी कधी अडचणींचे ठरू शकतात. सध्या महिलांच्या कामाचा ताण वाचावा यासाठी अनेक खाद्यपदार्थ प्रक्रिया करून फ्रिजमध्ये साठवून ठेवले जातात. अर्थातच याला फ्रोजन पदार्थ म्हणतात. यामध्ये फ्रोजन मटारचादेखील आवर्जून समावेश होतो. अलीकडे लोक फ्रोजन मटारचा वापर प्रचंड करत आहेत.
मटार कचोरी असो किंवा मटार पनीरची भाजी ज्यांना वाटाण्याची चव आवडते ते वर्षभर वाटाणा खाण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, हिवाळ्यात मिळणारे वाटाणे ताजे तर असतातच, पण चवही चांगली असते. परंतु काही लोक उन्हाळ्यातही मटारची चव चाखण्यासाठी गोठवलेल्या अर्थातच फ्रोजन मटारचा आधार घेतात. फ्रोजन मटार आपला सतत मटार सोलण्याचा त्रास वाचवतात आणि वाटाण्याची आपली क्रेविंगही भागवतात. परंतु फ्रोजनपेक्षा ताजे अन्नपदार्थ नेहमीच उत्तम असतात. तुम्हाला माहित आहे का, फ्रोजन मटारचे जास्त सेवन केल्याने आपल्या आरोग्यास हानी पोहोचू शकते. फ्रिजमधील या गोठवलेल्या वाटाण्याचं जास्त सेवन केल्याने तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. आज आपण फ्रोजन मटारच्या आरोग्याशी संबंधित अशाच काही दुष्परिणामांबद्दल जाणून घेणार आहोत.
फ्रोजन पदार्थांमुळे वजन प्रचंड वाढते. गोठवलेल्या वाटाण्यांमध्ये जास्त कॅलरी असतात. त्यामुळे याचे जास्त सेवन केल्याने एखाद्या व्यक्तीचे वजन वेगाने वाढू शकते. खरं तर वाटाणा रेफ्रिजरेट करताना त्यात काही प्रिझर्व्हेटिव्हस घातले जातात. ज्यात स्टार्चचे प्रमाण जास्त असते. स्टार्चच्या अतिरेकामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढून लठ्ठपणा येऊ शकतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फ्रोजन मटार खाण्यावर ताबा ठेवायला हवा.
फ्रोजन मटार अर्थातच प्रक्रिया करून गोठवलेल्या वाटाण्यांचे जास्त सेवन केल्याने एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचा धोका देखील वाढू शकतो. खरं तर फ्रोजन मटारची चव टिकवून ठेवण्यासाठी त्यात स्टार्चचा वापर केला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती वाटाण्यामध्ये असलेल्या स्टार्चचे जास्त प्रमाणात सेवन करते तेव्हा त्याचा शरीरावर हानिकारक परिणाम होतो. हा स्टार्च साखरेत बदलून मधुमेहाचा धोका वाढवतो.
गोठवलेल्या हिरव्या वाटाण्यांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हाय बीपीची तक्रार वाढू शकते. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी फ्रोजन मटार खाणे शक्यतो टाळावे.
फ्रोजन मटार अर्थातच गोठवलेल्या वाटाण्यांमध्ये ताज्या वाटाण्यापेक्षा जास्त ट्रान्स फॅट असतात. यामध्ये असलेल्या प्रिझर्व्हेटिव्हचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होतो. ज्यामुळे व्यक्तीला हाय बीपी आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
संबंधित बातम्या