Health Benefits of Drinking Turmeric Water: औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद केवळ जेवणाचा रंग आणि त्वचेची चमक वाढवत नाही तर ती आरोग्यासाठीही असंख्य फायदे देते. हळदीमध्ये लोह, तांबे, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई सारख्या अनेक पोषक तत्वांसह अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे रोगप्रतिकार शक्ती वाढवून अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. सामान्यतः लोक जेवणातून हळदीचे सेवन करतात. अनेकांना हळदीचे दूध घेण्याची देखील सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की हळदीचे पाणी पिणे रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. चला तर जाणून घ्या हळदीचे पाणी पिण्याचे फायदे आणि ते कसे बनवावे.
जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात हळदीच्या पाण्याचा अवश्य समावेश करा. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन फॅट वाढवणारे टिश्यू तयार होण्यास प्रतिबंध करू शकते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक वेळा माणूस लठ्ठ होऊ लागतो. अशा परिस्थितीत हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन इंसुलिनची पातळी वाढवून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते.
हळदीमध्ये असलेले अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यास आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या संक्रमण आणि रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. मजबूत प्रतिकार शक्तीसाठी दररोज रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. हळदीमध्ये असलेल्या लिपोपोलिसेकेराइडच्या मदतीने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी वाढतात.
हळदीचे पाणी मधुमेह असलेल्या लोकांसाठी वरदान ठरू शकते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य ठेवून मधुमेहाचा धोका कमी करते.
हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे सुरकुत्या, निस्तेज त्वचा, त्वचेची जळजळ यासारख्या वृद्धत्वाच्या समस्या दूर होऊन त्वचा उजळ होते. त्वचेसोबतच केसांच्या वाढीसाठी हळद फायदेशीर मानली जाते. टोनर किंवा हेअर वॉश म्हणून याचा वापर केल्याने केसांची वाढ सुधारण्यास आणि कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
हळदीच्या पाण्याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या जसे की डायरिया, अपचन, बद्धकोष्ठता, पोटात मुरडा येणे, पोटदुखी इत्यादी दूर होऊन शरीरातील पित्त योग्य प्रकारे तयार होण्यास मदत होते.
जर तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायचे असेल तर ते तयार करण्यासाठी प्रथम एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर हळद, लिंबू आणि मध घालून चांगले मिक्स करा. आपण हवे असेल तर तुम्ही फक्त हळद आणि पाणी देखील घेऊ शकता.
टीप - हळद हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते कारण त्यात भरपूर औषधी गुणधर्म असतात. असे असूनही हळदीचे सेवन मर्यादित प्रमाणातच करण्याचा सल्ला दिला जातो. याच्या अतिसेवनाने आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. हळदीचे योग्य प्रमाण जाणून घेण्यासाठी आणि त्याचे आरोग्य फायदे घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)