Health Benefits of Banana Leaves: केळी खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील. पण तुम्हाला माहित आहे का की केवळ केळीचे फळच नाही तर त्याची पाने देखील आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. केळीच्या पानांमध्ये आवश्यक फायटोन्यूट्रिएंट्स, सेलेनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि डायटरी फायबर सारखे पोषक आणि औषधी गुणधर्म असतात. एवढेच नव्हे तर केळीमध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया केळीच्या पानांचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत आणि त्यांचे सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती आहे.
केळीची पाने अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. इतकंच नाही तर ही पाने व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करून लवकर बरे होण्यासही मदत करतात.
केळीच्या पानांचे पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवून त्वचेला मॉइश्चराइझ ठेवण्यास मदत करते. यामुळे एलर्जी, पुरळ इत्यादींपासून सुटका होऊन त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
केळीच्या पानांचा रस प्यायल्याने अॅनिमियाच्या समस्येपासून सुटका मिळते. केळीच्या पानांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही.
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासात असाल तर केळीच्या खोडाचा रस पिण्यास सुरुवात करा. केळीच्या पानांच्या रसात मुबलक प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते आणि अतिखाण्यापासून ही बचाव होतो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
केळीच्या पानांमध्ये असलेले व्हिटॅमिन बी ६ आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
केळीची पाने पाण्यात उकळल्यानंतर हे पाणी गाळून पिऊ शकता. याशिवाय तुम्ही केळीची पाने थेट चावून खाऊ शकता किंवा चहा बनवूनही पिऊ शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)