Black Pepper Benefits: वेट लॉसपासून इम्युनिटी बूस्ट करते काळी मिरी, रोज खाल्ल्याने मिळतात आश्चर्यकारक फायदे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Black Pepper Benefits: वेट लॉसपासून इम्युनिटी बूस्ट करते काळी मिरी, रोज खाल्ल्याने मिळतात आश्चर्यकारक फायदे

Black Pepper Benefits: वेट लॉसपासून इम्युनिटी बूस्ट करते काळी मिरी, रोज खाल्ल्याने मिळतात आश्चर्यकारक फायदे

Published Dec 21, 2023 01:48 PM IST

Winter Health Tips: प्रत्येक घरात मसाल्याचा भाग असलेल्या काळी मिरी खाण्याचे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात काळी मिरी खाण्याचे फायदे जाणून घ्या.

हिवाळ्यात काळी मिरी खाण्याचे फायदे
हिवाळ्यात काळी मिरी खाण्याचे फायदे (pexels)

Health Benefits of Black Pepper in Winter: हिवाळ्यात काढा बनवायचा असो किंवा जेवणाची चव वाढवण्यासाठी स्वयंपाकघरात काळ्या मिरीचा वापर विविध प्रकारे केला जातो. आरोग्यासाठी काळ्या मिरीचे फायदे पाहता काळ्या मिरीला किंग ऑफ स्पाइस म्हणजेच मसाल्यांचा राजा देखील म्हटले जाते. काळी मिरीमध्ये अँटी-मायक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल, अँटी-फ्लॅट्युलेन्स, ड्युरेटिक आणि डायजेस्टिव्ह गुण आढळतात. हे वजन कमी करण्यात आणि व्यक्तीची पचनसंस्था आणि प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात काळी मिरी खाल्ल्याने तुम्हाला कोणते आरोग्यदायी फायदे होतात, जे जाणून घ्या.

सर्दी-खोकला

हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास सतावतो. या काळात ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही काळी मिरी खाऊ शकता. हिवाळ्यात काळ्या मिरीचा काढा प्यायल्याने सर्दी, खोकला यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. एवढेच नाही तर काळी मिरी खाल्ल्याने घसादुखीपासूनही आराम मिळतो. सर्दी-खोकला झाल्यास १५ दिवसांपर्यंत एक एक काळी मिरी वाढवत आणि नंतर १५ दिवसांपर्यंत एक एक काळी मिरी कमी करत याचे सेवन करा. हा उपाय करून अगदी जुनी सर्दीही बरी होऊ शकते.

वेट लॉस

तुम्ही वाढच्या वजनाने त्रस्त असाल तर ते कमी करण्यासाठी तुमच्या आहारात काळी मिरीचा समावेश करा. काळ्या मिरीमध्ये असलेले पाइपरिन आणि अँटीओबेसिटी गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करतात. लठ्ठपणापासून सुटका मिळवण्यासाठी हे उत्तम उपाय आहे.

पचन

हिवाळ्यात पचनाच्या समस्या वारंवार त्रास देऊ लागतात. अशा स्थितीत काळ्या मिरीमध्ये असलेले पाइपरिन पोटातील पाचक एन्झाईम्सला चालना देण्याचे काम करते. हे व्यक्तीची पचन क्षमता वाढवण्यास मदत करते.

सांधेदुखीपासून आराम

हिवाळ्यात बऱ्याच लोकांना स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास होतो. जर तुम्हालाही सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात काळी मिरी समाविष्ट करा. याच्या नियमित सेवनाने सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो. काळ्या मिरीमध्ये असलेले अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी अर्थरायटिस गुण वेदना आणि सूज कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

 

मजबूत रोगप्रतिकार शक्ती

रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही काळी मिरीपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन करू शकता. काळ्या मिरीमध्ये आढळणारे गुण शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner