Health Benefits of Radish Leaves: बऱ्याच लोकांना मुळा खायला आवडत नाही. तर बऱ्यात घरांमध्ये मुळा सलादमध्ये खाण्यासोबतच त्याचे पराठे आणि चटणी बनवून आवडीने खाल्ले जाते. मुळामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि एस्कॉर्बिक अॅसिड, लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड आणि फॉस्फरस सारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात. हे सर्व हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. पण मुळा वापरताना त्याची पाने कचऱ्यात फेकून दिले जातात. तुम्ही सुद्धा असे करत असाल हे करुन नका. मुळ्याची पाने खाण्यास अतिशय चविष्ट तर असतातच पण मूळव्याध, बद्धकोष्ठता आणि एनिमिया यांसारख्या समस्या दूर ठेवण्यासही मदत करतात. जाणून घ्या मुळ्याची पाने खाण्याचे फायदे.
मुळ्याच्या पानांचे सेवन केल्याने शरीराची इम्युनिटी बूस्ट होते. यामध्ये असलेले लोह आणि जीवनसत्त्वे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. मुळ्याच्या पानांचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन सुधारते आणि अॅनिमियाची समस्याही दूर होते.
पोटाच्या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही मुळ्याच्या पानांचे सेवन करू शकता. मुळ्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, जे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल फंक्शन सुधारून बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या कमी करण्यास मदत करते.
अँटीऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लामेटरी गुणांनी समृद्ध मुळ्याच्या पानांचे सेवन केल्याने यूरिक अॅसिडच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. मुळ्याची पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. ज्यामुळे यूरिक अॅसिडची समस्या कमी होते.
फायबरने समृद्ध मुळ्याच्या पानांचे सेवन केल्याने मूळव्याधच्या समस्येपासून आराम मिळतो. हे खाल्ल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते. एका संशोधनानुसार मुळ्याची पाने सूज आणि जळजळ यासारख्या समस्या कमी करु शकतात. मुळव्याधवर घरगुती उपाय म्हणून वाळलेल्या मुळ्याच्या पानांचे चूर्ण सम प्रमाणात साखर आणि पाण्यात मिसळून सेवन केल्यास फायदा होतो. याशिवाय ही पेस्ट प्रभावित भागावर लावल्याने सुद्धा फायदा होऊ शकतो.
मधुमेह असलेले लोक त्यांच्या आहारात मुळ्याच्या पानांचा समावेश करू शकतात. मुळ्याच्या पानांचा पाण्यापासून बनलेला अर्क अल्फा-ग्लुकोसिडेस क्रियाकलाप रोखून मधुमेहाची समस्या कमी करू शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)