Mint Tea Benefits: पुदिन्याच्या चहाचा करा रूटीनमध्ये समावेश, पचनपासून वेट लॉसपर्यंत होईल मदत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mint Tea Benefits: पुदिन्याच्या चहाचा करा रूटीनमध्ये समावेश, पचनपासून वेट लॉसपर्यंत होईल मदत

Mint Tea Benefits: पुदिन्याच्या चहाचा करा रूटीनमध्ये समावेश, पचनपासून वेट लॉसपर्यंत होईल मदत

May 13, 2024 11:42 AM IST

Benefits of Mint Tea: उन्हाळ्यात पचन आणि डिहायड्रेशनच्या समस्या दूर करण्यासाठी दररोज आपल्या आहारात पुदिन्याच्या चहाचा समावेश करा. हे खूप फायदेशीर आहे आणि मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करते.

पुदिन्याचा चहा पिण्याचे फायदे
पुदिन्याचा चहा पिण्याचे फायदे (unsplash)

Health Benefits of Drinking Mint Tea: कडक उन्हात खाण्या-पिण्याची पूर्ण काळजी घ्यावी लागते. त्यामुळे पचनक्रिया बरोबर राहते, सोबतच शरीराचे तापमानही वाढत नाही. कारण तापमान वाढल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. या ऋतूमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी अनेक नैसर्गिक गोष्टी उपलब्ध असतात. यामध्ये पुदीनाचा समावेश आहे. ज्याचा उपयोग केवळ रिफ्रेशिंग टेस्टसाठी केला जात नाही तर संपूर्ण शरीराला ताजेतवाने करतो. त्यामुळे शरीराला आतून थंडावा मिळतो. जर तुम्ही दररोज पुदिन्याचा चहा प्यायला सुरुवात केली तर तुम्हाला खूप फायदे होतील. जाणून घ्या पुदिन्याचा चहा पिण्याचे फायदे.

पोटदुखीपासून दिलासा

उन्हाळ्यात पचनशक्ती कमजोर होते. त्यामुळे काहीही पचत नाही. जर तुम्ही तुमच्या आहारात पुदिन्याचा चहा घेण्यास सुरुवात केली तर मेन्थॉलमुळे ब्लोटिंग, अपचन आणि गॅसची समस्या दूर होईल. जेवल्यानंतर एक कप पुदिन्याचा चहा प्यायल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते.

श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका

दररोज पुदिन्याचा चहा प्यायल्यास श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. पुदिन्यात नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे तोंडातील दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया काढून टाकतात. त्यातून पुदिन्याचा सुगंधही निर्माण होतो.

माइंड आणि बॉडी रिलॅक्स करते

पुदिन्याचा चहा प्यायल्याने बॉडी आणि माइंड रिलॅक्स होते. दररोज एक कप गरम पुदिन्याचा चहा प्यायल्याने स्ट्रेस आणि टेन्शन कमी होण्यास मदत होते. तसंच मनाला शांतता आणि आराम वाटतो.

घशातील खवखव कमी करते

पुदिन्याचा चहा प्यायल्याने श्वसन संस्थेवरही परिणाम होतो. उन्हाळ्यात खोकला, सर्दी आणि छातीत जडपणा जाणवत असेल तेव्हा पुदिन्याचा चहा प्या. हे श्वसनमार्ग उघडण्यास आणि मुक्तपणे श्वास घेण्यास मदत करते.

पीरियड क्रॅम्प्समध्ये आराम

पुदिन्याचा चहा स्नायूंना आराम देतो. त्यामुळे हा चहा प्यायल्याने पीरियड्स दरम्यान होणारे क्रॅम्प्स कमी होण्यास मदत मिळते.

त्वचेला बनवते हेल्दी

रोज पुदिन्याचा चहा प्यायल्याने त्वचेवर ग्लो दिसतो. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म फ्री रॅडिकल्सपासून होणारे नुकसान टाळतात आणि जळजळ कमी करतात.

वजन कमी करण्यात मदत

वजन कमी करण्यात पुदिन्याच्या चहाचे अनेक फायदे आहेत. ते प्यायल्याने भूक कमी होते, चयापचय वाढते आणि पचनासही मदत होते. त्यामुळे वजन कमी करणे आणि नियंत्रित करणे सोपे होते.

उन्हाळ्यात शरीराला ठेवते हायड्रेट

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. पुदिन्याचा चहा प्यायल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात द्रव मिळतो. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner