Friendship Day 2024: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का 'फ्रेंडशिप डे' साजरा करायला कोणी सुरुवात केली? मैत्रीचाही एक दिवस असावा हे कोणाच्या मनात आलं? जेव्हा प्रत्येकजण आपल्या मित्रांसोबत मैत्री साजरी करतो. भारत आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. तर युनायटेड स्टेट्समध्ये ३० जुलै रोजी 'आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस' साजरा केला जातो.
फ्रेंडशिप डेची कल्पना सर्वप्रथम जॉयस हॉलने १९५८ मध्ये दिली होती. जॉयस हॉल हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक होते. आणि एका मित्रांमधील बंधांमुळे प्रेरित झाले होते. त्यानंतर त्यांच्या मनात कल्पना आली की, मित्रांनी आपली मैत्री आणि प्रेम शेअर करण्यासोबतच ते नाते साजरे करावे. मिस्टर हॉलची ही कल्पना लोकांना खूप आवडली आणि हळूहळू जास्त लोक फ्रेंडशिप डे साजरा करू लागले. अशाप्रकारे जगभरात फ्रेंडशिप डे साजरा होऊ लागला.
१९९८ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने ३० जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला होता. त्यानंतर, संयुक्त राष्ट्र महासभेने २०११ साली ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. फ्रेंडशिप डे साजरा केल्याने लोक, देश, संस्कृती आणि विविध लोकांमध्ये प्रेम आणि शांतता निर्माण होण्यास मदत होईल. आणि फ्रेंडशिप डे सर्वांमध्ये एका प्रेमळ ब्रीजसारखे काम करेल.
फ्रेंडशिप डेबाबत विविध मान्यता आहेत. याबाबत अनेक गोष्ट ऐकायला आणि वाचायला मिळतात. त्याप्रमाणेच फ्रेंडशिप डे साजरा करण्यामागे एक गोष्ट प्रसिद्ध आहे. त्यामुळेच फ्रेंडशिप डे ची सुरुवात झाल्याचं सांगितलं जातं. अमेरिकेत १९३५ साली ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. ही बातमी जेव्हा त्या मृत व्यक्तीच्या मित्राला समजली, तेव्हा त्या मित्राने या बातमीने निराश होऊन आत्महत्या केली. त्यांच्यातील मैत्री आणि आपुलकी लक्षात घेऊन ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची लोकप्रियता वाढली आणि भारतासह अनेक देशांनी फ्रेंडशिप डे स्वीकारला गेला.
मैत्री ही कोणत्याही वयापुरती मर्यादित नसते. कोणत्याही वयात जेव्हा आपण कुणासोबत बसून विचार न करता बोलू शकतो, हसू शकतो, आपले विचार मांडू शकतो, तेही समोरची व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल याचा विचार न करता. खरी मैत्री इथेच असते. मैत्रीमध्ये, लोक कोणत्याही अटीशिवाय एकमेकांना जसे आहेत तसे स्वीकारतात. अलीकडे फ्रेंडशिप डे मोठ्या उत्सहात साजरा होतो. प्रत्येक लोक वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करतात.