Friendship Day 2024: 'फ्रेंडशिप डे' बनवा आणखीन स्पेशल! मित्रांना द्या 'या' हटके शुभेच्छा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Friendship Day 2024: 'फ्रेंडशिप डे' बनवा आणखीन स्पेशल! मित्रांना द्या 'या' हटके शुभेच्छा

Friendship Day 2024: 'फ्रेंडशिप डे' बनवा आणखीन स्पेशल! मित्रांना द्या 'या' हटके शुभेच्छा

Aug 02, 2024 12:13 PM IST

Friendship Day Wishes In Marathi: फ्रेंडशिप डेचा दिवस आणखीन खास बनवण्यासाठी अनेक लोक आपल्या मित्रांना गिफ्ट्स देतात, बाहेर फिरायला जातात परंतु ज्यांना या गोष्टी करणे शक्य होणार नाही, ते लोक आपल्या मित्रांना हे खास संदेश पाठवू शकता.

Friendship Day Wishes In Marathi
Friendship Day Wishes In Marathi

Friendship Day Wishes In Marathi:  बाहेरील देशांप्रमाणेच भारतातसुद्धा 'फ्रेंडशिप डे' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यंदा येत्या रविवारी म्हणजेच ४ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे असणार आहे. मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आणि खास नाते असते. ज्या गोष्टी आपण आपल्या आई-वडील, भावंड आणि नातेवाईकांसोबत शेअर करू शकत नाही, त्या आपण आपल्या मित्रांसोबत अगदी धैर्याने आणि मोकळेपणाने शेअर करतो. त्यामुळेच प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक खास व्यक्ती असतेच ज्याला फ्रेंड म्हणतात. फ्रेंडशिप डेचा दिवस आणखीन खास बनवण्यासाठी अनेक लोक आपल्या मित्रांसोबत केक कट करतात, गिफ्ट्स देतात, बाहेर फिरायला जातात परंतु ज्यांना या गोष्टी करणे शक्य होणार नाही, ते लोक आपल्या मित्रांना हे खास संदेश पाठवून फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देऊ शकता.

 

'फ्रेंडशिप डे' मराठी मेसेज

''निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना सुगंध हवा असतो,

माणूस एकटा कसा राहणार?

त्यालाही मैत्रीचा बंध हवा''

Happy Friendship Day

 

''रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात,

पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात,

त्या रेशमी बंधनांना मैत्री असं म्हणतात''

Happy Friendship Day

 

''मैत्रीचा हटके अंदाज हवा,

तुझ्या ह्रदयात आठवणींचा हळुवार कप्पा हवा,

तू फोन कर अथवा नको

पण मला तुझा दररोज एक मेसेज तरी हवा''

Happy Friendship Day

 

''पावसात जेवढा ओलावा नसेल, तेवढा जिव्हाळा मैत्रीत असतो, मैत्रीतल्या सावलीचा अर्थ प्रत्येकाला उन्हात गेल्यावरच कळतो''

Happy Friendship Day

 

''जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,

आनंद दाखवायला हास्याची गरज नसते,

दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,

न बोलता ज्यामध्ये सारे समजते,

ती म्हणजे मैत्री असते....''

हॅपी फ्रेंडशिप डे!

 

''प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा

मित्रांच्या कट्ट्यांवर येणारी मजा

काही औरच असते...''

हॅपी फ्रेंडशिप डे!

 

''आयुष्यातील काही क्षण खूप खास असतात,

जे आयुष्याला सुगंधित करण्यासाठी असतात,

एका सुंदर योगायोगाने आम्ही तुमच्याशी मैत्री केली,

हे योगायोगही मोठ्या योगायोगाने घडतात.''

Happy Friendship Day

 

''फुलासारखं हसणं हेच आयुष्य,

आनंदी राहून दु:ख विसरून जाणं हेच आयुष्य

एकमेकांना भेटून माणसं सुखी झाली तर काय,

न भेटता मैत्री जपणं हेच आपलं आयुष्य.''

हॅप्पी फ्रेंडशिप डे

 

''मैत्री हसवणारी असावी

मैत्री चिडवणारी असावी

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी

एक वेळेस ती भांडणारी असावी

पण कधीच बदलणारी नसावी''

Happy Friendship Day

 

''मैत्री एक सोपी व्याख्या आहे…

रोज आठवण यावी असं काही नाही,

एवढंच कशाला रोज भेट व्हावी

असंही काहीच नाही,

पण मी तुला विसरणार नाही,

ही झाली खात्री आणि

तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री'' – पु. ल. देशपांडे

Happy Friendship Day

Whats_app_banner