Friendship Day Wishes: 'पंखाशिवाय उडण्याचे स्वप्न..', 'या' सुंदर मराठी संदेशाने 'फ्रेंडशिप डे' बनवा आणखीन खास-friendship day 2024 wishes send these marathi friendship poems to a special person ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Friendship Day Wishes: 'पंखाशिवाय उडण्याचे स्वप्न..', 'या' सुंदर मराठी संदेशाने 'फ्रेंडशिप डे' बनवा आणखीन खास

Friendship Day Wishes: 'पंखाशिवाय उडण्याचे स्वप्न..', 'या' सुंदर मराठी संदेशाने 'फ्रेंडशिप डे' बनवा आणखीन खास

Aug 04, 2024 07:45 AM IST

Happy Friendship Day 2024:भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा होतो. त्याप्रमाणे आज ४ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे सर्वजण सेलिब्रेट करत आहेत.

'फ्रेंडशिप डे'चे सुंदर मराठी संदेश
'फ्रेंडशिप डे'चे सुंदर मराठी संदेश (Unsplash/Helena Lopes)

Happy Friendship Day 2024: आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मित्रांचा सन्मान करण्यासाठी. आणि त्यांच्यासोबतचे आपले नाते साजरे करण्यासाठी, एक खास प्रसंग म्हणून दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा होतो. त्याप्रमाणे आज ४ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे सर्वजण सेलिब्रेट करत आहेत. हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी, सकाळी उठल्याबरोबर आपल्या मित्रांना सुंदर संदेश पाठवून त्यांचा हा दिवस तुम्ही आणखी खास बनवू शकता.

'फ्रेंडशिप डे'चे सुंदर मराठी संदेश

''जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,

आनंद दाखवायला हास्याची गरज नसते,

दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,

न बोलता ज्यामध्ये सारे समजते,

ती म्हणजे मैत्री असते....''

हॅपी फ्रेंडशिप डे!

 

''मैत्री हसवणारी असावी

मैत्री चिडवणारी असावी

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी

एक वेळेस ती भांडणारी असावी

पण कधीच बदलणारी नसावी''

Happy Friendship Day

 

''पंखांशिवाय उडण्याचे स्वप्न

मैत्रीचं जगही छान असतं.''

फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा

 

‘’जीवनात कितीही मित्र भेटू द्या

पण आपल्या शाळेतल्या

मित्रांना कधीच विसरता येत नाही''

Happy Friendship Day

 

''आयुष्यातील काही क्षण खूप खास असतात,

जे आयुष्याला सुगंधित करण्यासाठी असतात,

एका सुंदर योगायोगाने आम्ही तुमच्याशी मैत्री केली,

हे योगायोगही मोठ्या योगायोगाने घडतात.''

Happy Friendship Day

‘’गाभुळलेल्या आठवणी विणणारा

एक नाजूक धागा!''

Happy Friendship Day

 

''आमच्या मैत्रीचे एकच तत्व ,

जेव्हा तुम्हाला स्वीकारले जाते,

तेव्हा तुमच्यातील सर्व काही स्वीकारले जाते.''

फ्रेंडशिप डे २०२४ च्या शुभेच्छा

 

''रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात,

पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात,

त्या रेशमी बंधनांना मैत्री असं म्हणतात''

Happy Friendship Day

विभाग