Happy Friendship Day 2024: भारतमध्ये ४ ऑगस्ट रोजी अर्थातच उद्या 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जाणार आहे. वास्तविक देशात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी हा मैत्रीचा दिवस साजरा केला जातो. त्याप्रमाणे उद्या फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी आपले मित्र खूपच खास असतात. मात्र अनेकदा बालपणीच्या मित्रांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. या मित्रांसोबत शाळेच्या आणि आपल्या बालपणीच्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात. जेव्हा आपल्याला दुनियेची ओळख नसते तेव्हा आपण एकमेकांना साथ द्यायला सुरुवात केलेली असते. त्यामुळेच बालपणीचे मित्र अत्यंत खास असतात. अशाच बालपणीच्या मित्रांना या गोड शुभेच्छा देऊन त्यांचा फ्रेंडशिप डे आणखी खास बनवा.
''बालपणातील मैत्री म्हणजे
एक खुणेची जागा
गाभुळलेल्या आठवणी विणणारा
एक नाजूक धागा!''
हॅप्पी फ्रेंडशिप डे
''किती सुंदर होते ते लहानपणाचे दिवस
दोन बोट जोडली की, दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची
मोठे होता होता सरलं सारं बालपण
मैत्री आपली अशीच राहील
आज, उद्या आणि कायम''
Happy Friendship Day
''आयुष्यात लाखो मित्र आले आणि गेले
पण बालपणातील त्या मित्रांची जागा
कोणीच घेऊ शकत नाही
कारण ते दिवसच खास होते'
Happy Friendship Day
''मैत्री म्हटली की आठवतं ते बालपण
आणि मनातून मिळालेलं खरखुरं
शहाणपण''
हॅप्पी फ्रेंडशिप डे
तुझी सोबत, तुझी संगत
आयुष्यभर असावी..
नाही विसरणार मैत्री तुझी,
तू फक्त शेवटपर्यंत निभवावी
हॅप्पी फ्रेंडशिप डे
''मित्र नेहमी अलंकाराप्रमाणे सौंदर्या वाढवणारे नसावेत,
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे
मित्र दैवानेच लाभतात''- व. पु. काळे
Happy Friendship Day
''मनाच्या छोट्याशा कोपऱ्यात
काही जण हक्काने राज्य करतात
त्यालाच तर ‘मैत्री’ म्हणतात''
Happy Friendship Day
''बालपणीची
ती श्रीमंती
कुणास ठाऊक
कुठे हरवली
कधी काळी
पावसाच्या पाण्यात
मित्रांसोबत आम्ही जहाजं चालवली!''
Happy Friendship Day
‘''मित्र’ म्हणजे
एक आधार
एक विश्वास
एक आपुलकी
आणि एक अनमोल साथ
जी मला मिळाली तुझ्या रुपाने''
हॅप्पी फ्रेंडशिप डे
''मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा
मैत्री एक अतुट सोबत आयुष्याची''
Happy Friendship Day