Travel Forts In Mumbai : स्वप्नांची नगरी मुंबई हे खूप मोठे, सुंदर आणि आकर्षक शहर आहे. मुंबईत अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळे आहेत, ज्यामुळे हे शहर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. मुंबईतील बड्या सिनेतारकांची घरे पाहण्यासाठी लाखो लोक दरवर्षी इथे येतात. परंतु, मुंबईच्या या आलिशान गर्दीत अनेक पुरातन किल्ले देखील लपलेले आहेत. या ऐतिहासिक किल्ल्यांचा ठिकाणी जाणे आणि या वास्तूंना भेट देणे देखील एक वेगळा अनुभव आहे.
मुंबईत असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांचे महत्त्व फक्त त्यांच्या स्थापत्यकलेमुळेच नाही, तर त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे देखील खूप मोठे आहे. यंदाच्या सुट्टीत मुंबईत दडलेल्या या किल्ल्यांची सफर नक्कीच एक अनोखा अनुभव देईल.
वांद्रे किल्ला किंवा कॅस्टेला डी अगुआदा हा मुंबईतील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध किल्ला आहे. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून २४ मीटर उंचावर स्थित आहे. या किल्ल्यावर 'दिल चाहता है' सारख्या लोकप्रिय चित्रपटांची शूटिंग देखील झाली आहे. हा किल्ले वांद्र्याच्या पॉश परिसरात आहे. इथे पोहोचणे देखील सोपे आहे.
वरळीचा किल्ला, मुंबईच्या ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. फार कमी लोकांना या किल्ल्याबद्दल माहिती असेल. इंग्रजांनी शत्रूंच्या जहाजांवर आणि समुद्रावरील चाच्यांवर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला डोंगराच्या माथ्यावर बांधला होता. हा किल्ला आठवडाभर खुला असतो आणि तुम्ही पहाटे ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत इथे जाऊ शकता.
वसई किल्ला, हा 'बसिन फोर्ट' म्हणूनही ओळखला जातो. हा किल्ला मुंबईच्या वसई भागात स्थित आहे. पोर्तुगीजांनी बांधलेल्या या किल्ल्याचा विस्तार ११० एकरात आहे. या किल्ल्यात ६ चर्च, तीन कॉन्व्हेंट आणि इतर इमारती होत्या. तथापि, हा किल्ला सध्या भग्नावस्थेत आहे, पण ते अजूनही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे.
इरमित्री किल्ला, जो डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो, हा किल्ला मराठा राजवटीत बांधला गेला होता. किल्ल्याभोवती एक अतिशय अद्भुत असे दृश्य दिसते, ज्यामुळे तुम्हाला इथले ३६० डिग्रीचे सुंदर दृश्य पाहता येते. उत्तरेला वसई किल्ला, पूर्वेला बोरिवली राष्ट्रीय उद्यान, आणि दक्षिणेला एस्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंगडम अशा विविध ठिकाणांचा देखावा तुम्ही येथे पाहू शकता.
क्रॉस बेट किल्ला हा एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या समुद्रात स्थित आहे. या किल्ल्यात तुम्हाला तेल रिफायनरी आणि मोठ्या गॅस टाक्यांसारखे ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात. येथे जाण्यासाठी स्पीड बोट्सचा वापर करता येतो.
मुंबईत, समुद्र किनारे आणि शाहरुख खानच्या ‘मन्नत’ घरासोबतच या ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देण्याची ही सफर तुम्हाला एका ऐतिहासिक प्रवासावर घेऊन जाईल. त्याचबरोबर मुंबईच्या छुप्या ऐतिहासिक ठिकाणांचा शोध घेतल्यास, तुम्हाला या शहराच्या इतर कोपऱ्यात दडलेली असंख्य रहस्ये कळू शकतात.