Pregnancy Tips: निरोगी गर्भधारणेसाठी, ९ महिने हे मॉर्निंग रुटीन फॉलो करा!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy Tips: निरोगी गर्भधारणेसाठी, ९ महिने हे मॉर्निंग रुटीन फॉलो करा!

Pregnancy Tips: निरोगी गर्भधारणेसाठी, ९ महिने हे मॉर्निंग रुटीन फॉलो करा!

Feb 23, 2024 06:43 PM IST

Healthy Pregnancy: गर्भधारणा हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण असतो. या काळात सर्व महिलांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी.

for healthy pregnancy follow this morning routine for 9 months
for healthy pregnancy follow this morning routine for 9 months (Dominika Roseclay)

प्रत्येक स्त्रीसाठी गर्भधारणा हा आनंदाच्या क्षणापेक्षा कमी नसतो. हा महिलांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. पण हा क्षण काही आव्हानेही घेऊन येतो. प्रत्येक स्त्रीला यातून जावंच लागत. या काळात महिलांनी स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गरोदरपणा हा फार नाजूक काळ आहे. अशावेळी महिलेला फक्त स्वत:चीच नव्हे तर पोटातील बाळाचीही काळजी घेणे गरजेचे असते. अनेक वेळा गरोदरपणात महिलांची तणावाची पातळी वाढते, त्याचा परिणाम मुलांवरही दिसून येतो. आरोग्य तज्ज्ञ महिलांना विशेषत: गर्भधारणेदरम्यान तणाव टाळण्याचा सल्ला देतात. महिला सुलभ प्रेग्नसीसाठी ९ महिन्यांच्या काळात एक प्रकारच मॉर्निंग रुटीन फॉलो करू शकतात. ज्यामुळे गर्भधारणा निरोगी राहील.

सकारात्मक सुरुवात

गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. यामुळे थकवा जाणवू लागतो. थकव्यामुळे महिलांनाही सकाळी उठण्यास उशीर होतो. पण तुमचं रुटीन योग्य असेल तर कोणतीही अडचण येणार नाही. अशा वेळी तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करायाला हवी. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाईल.

मेडिटेशन करा

योग आणि मेडिटेशन केवळ तुमचे शारीरिक आरोग्यच राखत नाही तर तुमचे मानसिक आरोग्यही राखते. आवर्जून रोज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सकाळी योगा करा. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होईल. रोज प्राणायाम करा. हे गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. योग तज्ञांच्या सल्ल्यानुसार, गर्भधारणेदरम्यान फक्त हलकी योगासने करा.

पाणी पिणे

पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. यामुळे प्रसूतीदरम्यान शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही. यासोबतच गरोदरपणात गॅस, बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंग या समस्यांपासूनही आराम मिळतो. दररोज किमान ८ ग्लास पाणी प्या. यामुळे आई आणि बाळ दोघेही निरोगी राहतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner