Foot Cleaning Tips: पाय स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरतील या पद्धती, क्षाणात येईल चमक
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Foot Cleaning Tips: पाय स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरतील या पद्धती, क्षाणात येईल चमक

Foot Cleaning Tips: पाय स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरतील या पद्धती, क्षाणात येईल चमक

Published Jul 25, 2024 07:03 PM IST

Foot Care Tips: आपल्या त्वचेप्रमाणेच आपल्या पायांची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे. पाय स्वच्छ करण्यासाठी या काही पद्धती उपयुक्त आहेत.

पाय स्वच्छ करण्याच्या पद्धती
पाय स्वच्छ करण्याच्या पद्धती (unsplash)

Ways to Clean Foot Easily: बहुतेक लोक आपला चेहरा नेहमी स्वच्छ ठेवतात, परंतु पाय साफ करायला ते विसरतात. पण ही सवय योग्य आहे का? असं म्हटलं जातं की, एखाद्याला आपण भेटतो तेव्हा समोरच्या व्यक्तीची पहिली नजर तुमच्या पायावर पडते. अशावेळी जर ते घाणेरडे असतील तर समोरच्यावर तुमचे इम्प्रेशन योग्य राहणार नाही. पाय नेहमी स्वच्छ आणि चमकदार असावेत असे वाटत असेल तर तुम्ही काही पद्धतींचा अवलंब करू शकता. येथे आम्ही असे ४ सोपे मार्ग सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पाय सहज साफ करू शकता.

कॉफी आणि नारळ तेलाच्या स्क्रबने स्वच्छ करा पाय

हा फूट स्क्रब बनवायला अतिशय सोपा असून तो प्रभावीही ठरू शकतो. हे बनविण्यासाठी आपल्याला फक्त २ चमचे बारीक केलेल्या कॉफी मध्ये २ चमचे साखर आणि एक चमचा नारळ तेल मिसळण्याची आवश्यकता आहे. या तिन्ही गोष्टी नीट मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्टी पायावर लावा आणि नीट चोळा. त्यानंतर १५ ते २० मिनिटे हे तसेच राहू द्या. नंतर पाय धुवून घ्या.

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस

पाय स्वच्छ करण्यासाठी चिमूटभर साखर आणि चिमूटभर बेकिंग पावडरमध्ये लिंबाचा रस मिक्स करा. नंतर स्क्रब तयार करा. हे पायांवर लावा आणि सर्कुलर मोशनमध्ये १० मिनिटे चांगली मसाज करा. याने पाय स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथब्रशचा सुद्धा वापर करू शकता. पाय स्वच्छ केल्यानंतर पाण्याने धुवून टॉवेलने पुसून घ्यावेत.

गुलाबजल आणि चंदन पावडर

गुलाबजल त्वचा क्लीन्झर आणि मॉइश्चरायझर सारखे काम करते. यासोबतच चंदन नैसर्गिक स्किन लाइटनिंग मध्ये मदत करते. या दोन गोष्टी मिक्स करून पेस्ट बनवा आणि नंतर हे मिश्रण गुडघ्यावर लावा. साधारण १५ मिनिटे मसाज करा. थंड पाण्याने धुण्यापूर्वी ते कोरडे होऊ द्या. चांगले कोरडे झाल्यावर हलकेच चोळून धुवून घ्या आणि नंतर पुसून घ्या.

प्यूमिक स्टोन आणि ब्रशने करा साफ

तुम्ही तुमच्या आई आणि आजीला प्यूमिक स्टोन वापरताना पाहिले असेल. तुम्ही सुद्धा प्युमिक स्टोन आणि ब्रशच्या मदतीने पाय स्वच्छ ठेवू शकता. या दोन्ही गोष्टी जवळजवळ सर्वच घरांमध्ये असतात. हे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. रोज अंघोळ करताना या दोन गोष्टींचा वापर केल्यास पाय चमकतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner