पावसामुळे ऊन आणि उष्णतेपासून आराम मिळतो. तसेच हवामानही अतिशय थंड आणि आल्हाददायक असते. असे असले तरी पावसाळा येताच अनेकांना टेन्शन येते. कारण पावसाळ्यात अनेक आजार होण्याची शक्यता असते. मग ते पाण्यातून असू देत किंवा खाद्यपदार्थांमधून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरते. त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
पावसाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर जीवनसत्त्वे, खनिजे यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या भाज्याही आरोग्यास हानी पोहोचवू लागतात, ही चिंतेची बाब आहे. कारण ओलावा वाढल्याने रोज खाल्ल्या जाणाऱ्या या फळे आणि भाज्यांमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात, जे पोटात गेल्यावर संसर्ग होण्याची आणि पाचन समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात कोणती फळे आणि भाज्या टाळाव्यात हे जाणून घेऊया...
वाचा: कुठे श्वानाची पूजा होते तर कुठे बुलेट गाडीची, वाचा भारतातील अनोख्या मंदिरांविषयी
पावसाळ्यात वांगी खाल्ल्याने चिडचिड आणि गॅसची समस्या वाढू शकते. याशिवाय पावसाळ्यात या भाजीमध्ये बुरशीजन्य रोगाचा धोका असल्याने अनेक जण पावसाळ्यात वांगी खाणेही टाळतात.
वाचा: पावसाळ्यात त्वचेवर पिंपल्स येत आहेत? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन पाहा
या ऋतूत हिरव्या भाज्यांमध्ये जास्त ओलावा असल्यामुळे बॅक्टेरिया निर्माण होऊन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या खाणे टाळा.
पावसाळ्यात कडधान्य खाणे टाळा. ओलावा जास्त असल्याने मोड आलेल्या कडधान्यात बुरशीचा धोका जास्त प्रमाणावर असतो. ज्यामुळे पचनक्रिया बिघडते, इन्फेक्शन होते आणि व्यक्ती आजारी पडतात. त्यामुळे पावसाळ्यात कडधान्ये खाणे टाळा.
वाचा: रोजच्या आहारात चिया सीड्सचा करा समावेश, राहा आजारांपासून लांब
व्हिटॅमिन डीने समृद्ध असलेले मशरुम आरोग्याच्या दृष्टीने चांगली भाजी मानली जाते. पण पावसाळ्यात ही भाजी खाणे टाळा. कारण ही भाजी दमट वातावरणात पिकवली जाते. त्यामुळे पावसाळ्यात त्यात धोकादायक जीवाणू वाढण्याची शक्यता असते. असे मशरुम खाल्याने पचनाशी संबंधीत समस्या निर्माण होऊ शकते.
पावसाळ्यात मासे किंवा कोळंबी सारखे सीफूड खाणे देखील टाळा. कारण सागरी सजीवांच्या प्रजननाचा हा काळ असतो. या ऋतूत मासे खाल्ल्याने फूड पॉयझनिंगचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मासे खाणे टाळा.
संबंधित बातम्या