मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care Tips: स्विमिंग पूलमध्ये जाण्यापूर्वी फॉलो करा हे स्किनकेअर रुटीन!

Skin Care Tips: स्विमिंग पूलमध्ये जाण्यापूर्वी फॉलो करा हे स्किनकेअर रुटीन!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 09, 2023 05:04 PM IST

Skin Care Before Swimming: उन्हाळा सुरु होताच अनेकजण स्विमिंग करायला जातात. पण स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन असते जे तुमच्या त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकते.

Skin Care
Skin Care (Freepik )

Skin Preparation Before Swimming: उन्हाळा सुरु होताच गरमीमुळे आपण अस्वस्थ होतो. अशावेळी स्विमिंग करणे उत्तम ठरते. अनेकजण आवर्जून उन्हाळ्यात स्विमिंग करायला जातात. शहरात स्विमिंग करायची म्हंटल की स्विमिंग पूलमध्ये जावं लागत. या स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन असते. हे क्लोरीन तुमच्या त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकते. क्लोरीनमुळे त्वचेवर कोरडेपणा, पुरळ उठणे, खाज सुटणे, जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळेच स्विमिंग पूलमध्ये उतरण्याआधी त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. स्विमिंग पूलमध्ये जाण्यापूर्वी नक्की कोणतं स्किनकेअर रुटीन फॉलो करू शकतो ते जाणून घ्या.

स्विमिंग पूलमध्ये जाण्यापूर्वी ‘हे’ करा

संपूर्ण शरीरावर हेवी मॉइश्चरायझर लावा.

५० पेक्षा जास्त एसपीएफ असलेले वॉटर-प्रूफ सनस्क्रीन वापरा.

पूलमध्ये जाण्यापूर्वी शॉवर घ्या.

तुमचा चेहरा, मान आणि खांद्यावर सनस्क्रीन लावा, खांदे विसरू नका.

स्विमिंग पूलमध्ये पोहल्यानंतर ‘हे’ करा

पूलमधून बाहेर आल्यावर ताबडतोब अंघोळ करा.

सौम्य बॉडी वॉश वापरा.

त्वचा ओलसर असताना, मॉइश्चरायझर किंवा तेलाचा जाड थर लावा. तलावाच्या पाण्यात असलेल्या क्लोरीनमुळे त्वचा खूप कोरडी होऊ शकते. त्यामुळे लगेच मॉइश्चरायझ करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग