मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight loss: हे रुटीन २१ दिवस फॉलो करा, मिळेल दिशा पाटणीसारखी स्लिम बॉडी!

Weight loss: हे रुटीन २१ दिवस फॉलो करा, मिळेल दिशा पाटणीसारखी स्लिम बॉडी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 16, 2024 10:08 AM IST

Disha Patani: वाढलेल्या वजनाने हैराण असाल तर फक्त २१ दिवसांचे हे रूटीन फॉलो करा. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होईल.

Follow this routine for 21 days to get slim body
Follow this routine for 21 days to get slim body (Instagram )

Tips for Weight Loss: लठ्ठपणा हे फारच कॉमन समस्या झाली आहे. अगदी वजन वाढीची ही समस्या महामारीसारखे वाढत आहे. वाढत्या वजनामुळे लोकांना बाकीचे आजार होतात. वाढलेल्या वजनामुळे हृदयावरही परिणाम होतो. अनेक लोक आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप मेहनत करतात. पण वजन कमी करणे सोपे नाही. योग्य डाएट आणि जिममध्ये तासनतास घाम गाळल्यानंतरही अनेकांच्या हाती निराशा येते. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही तुमच्या वाढलेल्या वजनाने हैराण असाल, तर फक्त २१ दिवस एक रूटीन फॉलो करा. यामुळे तुमची बॉडी प्रिसद्ध फिट अभिनेत्री दिशा पाटणी सारखी होऊ शकेल.

हे रुटीन करा फॉलो

रात्रीच्या जेवणाची वेळ

रात्रीचे जेवण सर्रास ९ ते १० अशा वेळेत होते. पण रात्रीच्या जेवणाची वेळ ७ ते ८ च्या दरम्यान असावी. रात्री उशीर झाला तर जेवणे टाळा. पण ८ वाजल्यानंतर शक्यतो जेवू नका.

रोज काही पावले चाला

जर तुम्हाला वर्कआउट करायला वेळ नसेल तर आवर्जून चाला. २१ दिवस दररोज अर्धा ते पाऊण तास चाला. असे केल्याने तुमच्या शरीराला चालण्याची सवय होईल बाबी याने फायदा होईल. हळूहळू जास्त किलोमीटर चालायला सुरुवात करा.

भात टाळा

वजन कमी करताना आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जमल्यास भात खाणे पूर्णपणे वगळा. भात खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या आहारातून भात काढून टाका.

मल्टीग्रेन्स खा

तुमच्या आहारात मल्टीग्रेन्सचा समावेश करणे गरजेचे आहे. ज्वारी, नाचणी आणि बाजरीसोबतच हिरव्या भाज्यांचे सेवन करा.

झोप गरजेची

वजन कमी करण्यात वर्कआउट आणि आहारासोबतच झोप खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्ही ८ तासांची पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे.

सकाळी वजन कमी करणारी पेये प्या

वजन कमी करणारी पेये सकाळी प्या. जिरे पाणी, मध किंवा लिंबू, तुमच्या सोयीनुसार जे आवडेल ते पेय पिऊ शकता.

तणाव कमी करा

वजन कमी करणे ही एक मोठी आणि लांब प्रक्रिया आहे. त्यामुळे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये जास्त ताण घेऊ नका. तुम्ही फक्त सातत्याने मेहनत करत रहा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel