Night Skin Care: हिवाळ्यात त्वचा ड्राय आणि काळी दिसत असेल तर झोपण्यापूर्वी लावा या गोष्टी, स्किन होईल सॉफ्ट
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Night Skin Care: हिवाळ्यात त्वचा ड्राय आणि काळी दिसत असेल तर झोपण्यापूर्वी लावा या गोष्टी, स्किन होईल सॉफ्ट

Night Skin Care: हिवाळ्यात त्वचा ड्राय आणि काळी दिसत असेल तर झोपण्यापूर्वी लावा या गोष्टी, स्किन होईल सॉफ्ट

Published Jan 29, 2024 11:39 PM IST

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात अनेकदा त्वचा खूप कोरडी आणि काळी दिसू लागते. अशा प्रकारच्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी चेहऱ्यावर लावल्या पाहिजे.

कोरडी त्वचा दूर करण्यासाठी नाइट स्किन केअर रुटीन
कोरडी त्वचा दूर करण्यासाठी नाइट स्किन केअर रुटीन (unsplash)

Night Skin Care Routine To Prevent Dry Flaky Skin: थंडीच्या दिवसांमध्ये बहुतेक लोकांना कोरड्या त्वचेचा त्रास होतो. कोरडेपणासोबतच अनेकांना त्वचेवर काळेपणा आणि पॅचेस दिसतात. यावर मात करण्यासाठी दिवसभर मॉइश्चरायझर लावले तरी त्याचा कोणताही परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत काही खास गोष्टींची काळजी घेणे आणि रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. जेणेकरून त्वचेला पाण्याशिवाय रात्रभर मॉइश्चरायझेशन सहज मिळू शकेल. चला तर मग जाणून घेऊया कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लावाव्या. कोरड्या त्वचेपासून मुक्त होऊन त्वचा सॉफ्ट होईल.

ग्लिसरीन आणि गुलाब जल

गुलाब पाणी नैसर्गिक टोनर म्हणून वापरले जाते. अर्ध्याहून अधिक ग्लिसरीन एका बॉटलमध्ये भरा आणि उरलेली बॉटल गुलाब पाणीने भरा. हे हलवून चांगले मिक्स करा आणि बाजूला ठेवा. हे मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा, हात आणि पायांवर लावा. यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होईल.

बदामाचे तेल

रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे काही थेंब हातात घेऊन चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. हे केवळ चेहऱ्याला मॉइश्चराइझ करण्याचे काम करत नाही तर त्वचा तरुण बनवते.

गरम पाण्यापासून दूर राहा

चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका. तसेच आंघोळीसाठी खूप गरम पाणी वापरू नका. त्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल नष्ट होऊ लागते आणि त्वचेवर अधिक कोरडेपणा आणि पॅचेस दिसू लागतात.

डेड स्किन काढून टाकावी

दररोज अंघोळ करण्यापूर्वी त्वचेवर जमा झालेली कोरडी डेड स्किन काढून टाका. ही डेड स्किन काढण्यासाठी पिठाच्या कोंडामध्ये दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा, मान, हात, पाय यावर हलक्या हाताने मसाज करा आणि पाण्याने धुवा. हे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करेल. तसेच त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ करेल.

 

साबण वापरू नका

हिवाळ्यात चुकूनही साबण वापरू नका. यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होईल. नैसर्गिक स्क्रब आणि बॉडी वॉशच्या मदतीने तुमची त्वचा स्वच्छ करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner