मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care Routine: सकाळी उठल्यावर त्वचेची घ्या विशेष काळजी, या गोष्टी केल्याने चमकेल चेहरा

Skin Care Routine: सकाळी उठल्यावर त्वचेची घ्या विशेष काळजी, या गोष्टी केल्याने चमकेल चेहरा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 16, 2024 11:33 PM IST

Healthy Skin Care Tips: आपली त्वचा चमकदार राहावी यासाठी आपण खूप मेहनत घेतो. फक्त ब्युटी प्रोडक्ट वापरणे पुरेसे नाही. तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी काय करता ते खूप महत्त्वाचे आहे. हे मॉर्निंग स्किन केअर रुटीन फॉलो करा.

मॉर्निंग स्किन केअर रूटीन
मॉर्निंग स्किन केअर रूटीन (unsplash)

Morning Skin Care Routine: आपली त्वचा नेहमीच चमकदार आणि निरोगी राहावी यासाठी महिला आणि मुली अनेक गोष्टी करत असतात. अनेक वेळा त्या वेगवेगळ्या प्रकारची महागडी उत्पादने वापरायला लागतात. पण फक्त ब्युटी प्रोडक्ट वापरून त्वचेची काळजी घेता येत नाही. तर रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या त्वचेला कसे पॅम्पर करता याचा त्वचेवर खोलवर परिणाम होतो. हे मॉर्निंग स्किन केअर टिप्स जर तुम्ही नियमित फॉलो केले तर तुम्ही डागरहित, गोरी आणि चमकदार त्वचा मिळवू शकता. जाणून घ्या मॉर्निंग स्किन केअर रूटीन

प्रथम चेहरा धुवा

सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हे अँटी रिंकल एजंट म्हणून काम करते जे तुमची त्वचा सुंदर आणि तरुण बनवते. सकाळी उठल्यानंतर त्वचेवर सूज आल्याचे दिसले तर आइस पॅक लावा.

डिटॉक्स ड्रिंक्स घ्या

स्वतःला हायड्रेटेड ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी लिक्विड पदार्थ प्या. लिंबू आणि मध घालून कोमट पाणी पिऊ शकता. याशिवाय नारळाचे पाणी देखील फायदेशीर ठरू शकते. ते त्वचा डिटॉक्स करते.

त्वचेची अत्यंत काळजी घ्या

तुम्ही सकाळी घरी बनवलेला फेस पॅक देखील वापरू शकता. जसे तुम्ही त्वचेच्या प्रकारानुसार टोमॅटो किंवा बेसनचा फेस पॅक लावू शकता. याशिवाय तुम्ही लिंबू ग्लिसरीन देखील वापरू शकता. त्यात मॉइश्चरायझिंग एजंट असतात, जे चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी करतात आणि त्वचेला टोन देखील करतात.

सनस्क्रीनचा वापर

कुठेही बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. ते न लावता बाहेर पडू नका. डार्क स्पॉट्स आणि टॅनिंग सारख्या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे उपयुक्त आहे. तसेच तुम्ही घरात असले तरी सनस्क्रीन लावा.

हेल्दी ब्रेकफास्ट

नाश्त्यात तळलेले अन्न न खाण्याचा प्रयत्न करा. दिवसाची सुरुवात फक्त हेल्दी फूडने करा. आरोग्यासोबतच ते त्वचेसाठीही फायदेशीर असते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग