मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diet for Skin: ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी फॉलो करा हे डाएट प्लॅन, महिन्याभरात दिसेल परिणाम

Diet for Skin: ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी फॉलो करा हे डाएट प्लॅन, महिन्याभरात दिसेल परिणाम

Jul 11, 2024 11:09 AM IST

Beauty Tips in Marathi: कितीही महागडी क्रीम, फेशियल किंवा ट्रीटमेंट असली तरी आतून निरोगी असल्याशिवाय चेहऱ्यावर चमक येणार नाही. असाच एक डाएट प्लॅन जाणून घ्या जो फॉलो करून तुम्ही ग्लोइंग स्किन मिळवू शकता.

ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी डाएट प्लॅन
ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी डाएट प्लॅन (pexels)

Diet Plan for Glowing Skin: सुंदर, चमकदार आणि निरोगी त्वचा प्रत्येकाला हवी असते. पण चमकदार त्वचा मिळण्यासाठी तिची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि बदलत्या आहाराच्या सवयीमुळे त्वचेची काळजी घेणे थोडे अवघड झाले आहे. याच कारणामुळे आज अनेक लोक त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करत आहे. चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्सची समस्या सामान्य झाली आहे. महागडे ब्युटी प्रोडक्ट वापरूनही दिलासा मिळत नाही. जर तुम्हीही त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल, निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या डाएटकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास तुम्ही निरोगी आणि चमकदार त्वचा सहज मिळवू शकता.

हिरव्या पालेभाज्याने चेहरा होईल चमकदार

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात आढळतात. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता कमी होते, ज्यामुळे हायपरपिग्मेंटेशन दूर होते. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच निरोगी चमक कायम राहील.

ट्रेंडिंग न्यूज

जास्तीत जास्त पाणी प्या

चेहऱ्यावर कितीही महाग क्रीम लावली तरी योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावर चमक येणार नाही. दिवसभरात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते, शरीरातून टॉक्सिन्स बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होते.

लिंबू आणि एलोवेरा ज्यूसने मिळेल ग्लोइंग स्किन

सकाळची सुरुवात लिंबूपाणी किंवा एलोवेरा ज्यूसने केली तर त्वचा चमकदार होईल. लिंबू पाणी शरीरातील टॉक्सिन्स एजंट कमी करण्याचे काम करते. सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने त्वचा सुधारते. आपण आपल्या डेली रुटीनमध्ये ताज्या एलोवेरा ज्यूसचा देखील समावेश करू शकता. हे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी चांगले आहे. तसेच त्वचा आतून सुधारण्याचे कार्य करते.

आहारात घ्या रंगबेरंगी फळ आणि भाज्या

ग्लोइंग स्किनसाठी डेली डाएटमध्ये फळांचा समावेश अवश्य करावा. फळांमध्ये जीवनसत्त्वे तसेच अनेक पोषक घटक असतात जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात. यासोबतच जेवणात सलादचा सुद्धा जरूर समावेश करा. यात काकडी, गाजर, टोमॅटो, कोबी, बीटरूट वापरा. या सर्व गोष्टींमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे खाल्ल्याने आरोग्य आणि त्वचा दोघांनाही फायदा होतो.

वेळेवर फॉलो करा डाएट प्लॅन

निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी डाएट रूटीन वेळेवर फॉलो करणं गरजेचं आहे. दररोज सकाळी ठराविक वेळेत हेल्दी नाश्ता करा. योग्य वेळी खा आणि जेवणात हिरव्या भाज्या, सलाद, दही आणि फळांचा समावेश करा. बाहेर जंक फूड खाण्याऐवजी स्नॅक्समध्ये हेल्दी स्नॅक्स आणि स्मूदीचा समावेश करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel