New Year Celebration Unique Ideas: अवघ्या दोन दिवसांनी नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही काय करणार आहात? प्रत्येक वेळी करता तसे पार्टी, जेवण, पिकनिक या गोष्टी करण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही या आयडिया पाहू शकता. दरवर्षी प्रमाणे त्याच त्या गोष्टी न करता काहीतरी नवीन पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करा. हे करणे काही अवघड काम नाही. नवीन वर्ष आपल्या प्रियजनांसोबत, त्यांच्या आवडीनिवडी, गरजा जाणून आणि त्यांना ओळखून साजरे करा. आपल्या लोकांसोबत मिळून एकत्र वेळ घालवला, काही गोष्टी करून तुम्ही आनंद आणि उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करू शकता. पाहा या काही यूनिक आयडिया.
प्रत्येक नवीन वर्ष आपल्यासोबत अनेक आशा- अपेक्षा घेऊन येतं त्यामुळे या वर्षी तुम्ही त्याच्या स्वागतासाठी तुमच्या घरात, अंगणात, बागेत किंवा पार्कमध्ये आशेचे बी किंवा रोप लावू शकता. या संदर्भात निसर्गोपचार तज्ज्ञ राजेश मिश्रा सांगतात की, घराजवळील बागेत तुम्ही पंचवटी लावू शकता. यामध्ये वड, पिंपळ, आवळा, अशोक आणि बेल या पाच झाडांचा समावेश करा. या सर्व झाडांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. तुम्ही एरेका पाम, मनी प्लांट, स्नेक प्लांट, पाइन असे रोप सुद्धा लावू शकता. तसेच तुम्ही प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याचा संकल्पही करू शकता.
सेलिब्रेशन म्हटले की खाण्याची रेलचेल आलीच. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये तुमचा फूड मेन्यु वेगळ्या पद्धतीने सजवणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. आहार सल्लागार डॉ. भारती दीक्षित यांच्या मते निसर्ग आपल्याला हिवाळ्यात पोषणाची देणगी देतो. म्हणून पोषण लक्षात घेऊन आपल्या पार्टीचा मेनू ठरवा. तुमच्या डिशमध्ये हिरव्या पालेभाज्या, बीटरूट, रताळे, फ्लेक्स सीड्स, तीळ इत्यादींचा समावेश करा. तळलेल्या रेसिपीऐवजी ग्रील्ड डिशेसला प्राधान्य द्या. तुम्ही यात वेगवेगळ्या प्रदेशातील पदार्थांचा देखील समावेश करू शकता.
गेम्स म्हटले की मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. त्यामुळे पार्टीची सुरुवात अशा खेळाने करा ज्यामुळे मुलांना आनंद तर होईलच पण मुलाच्या मनातील भावना देखील व्यक्त होतील. याच्या मदतीने तुम्ही फ्लॅश बॅकमध्ये संपूर्ण वर्ष आठवू शकता. काही आवडत्या क्षणांबद्दल कार्ड बनवा आणि रिकाम्या जागा सोडा आणि मुलांना ते भरण्यास सांगा. तुम्ही भविष्यातील बाबींशी संबंधित कार्ड देखील बनवू शकता. त्याला काय व्हायचे आहे? त्याला पुढच्या वर्षी काय करायचे आहे? अशा गोष्टी त्यात टाकता येतात. या खेळात लहान मुलांसोबत मोठे देखील सहभागी होऊन आनंद द्विगुणीत करू शकतात.
तुमच्या प्रियजनांच्या इच्छा पूर्ण करण्याचे वचन देऊन तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात करू शकता. यासाठी एक बरणी किंवा कंटेनर घ्या. घरातील सर्व सदस्यांच्या शुभेच्छा लिहिलेल्या चिठ्ठ्या त्यात ठेवा. पण इथे तुम्हाला काही अटी लागू कराव्या लागतील. जसे की तुमची इच्छा महाग नसावी, ती साधी असावी, दुसऱ्याचे मन दुखेल असे काहीही लिहू नये. आता त्या चिठ्ठ्या सर्वांसमोर एक-एक करून उघडा, त्या वाचा आणि पूर्ण करण्याचे वचन द्या.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही घरीच थिएटर बनवू शकता. संपूर्ण कुटुंबासोबत बसून, त्यांच्या आवडीचा चित्रपट पाहून आणि पॉपकॉर्न खाऊन नवीन वर्षाचे स्वागत करू शकता. हे तुमचा वेळ व्ही टाइम म्हणजेच फॅमिली टाइममध्ये रूपांतरित करेल. स्क्रीनवर चित्रपट पाहण्याऐवजी तुम्ही एकत्र बसून कौटुंबिक कार्यक्रमाचे व्हिडिओ, फोटो इत्यादी देखील पाहू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या