Tips to wear the perfect saree: साडी हा भारतीय महिलांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. इतर पोशाखांपेक्षा साडीमध्ये स्त्रियांचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं असं सर्वानांच वाटतं. काही स्त्रिया दररोज साडी नेसतात तर काही स्त्रिया कारणास्तव साडी नेसण्याच्या प्राधान्य देतात. साडी हा एक असा पोशाख आहे जो तुम्ही कोणत्याही सणापासून लग्नापर्यंत कुठेही परिधान करू शकता. सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त महिला ऑफिस आणि पार्ट्यांमध्येही साडी नेसतात. पूर्वीच्या स्त्रिया नेहमीच साडी नेसण्याच्या प्राधान्य देत होत्या. परंतु आता असे राहिले नाही. त्यामुळे अनेकांना साडी नेसणे आजही कठीण जाते. अनुभवी महिलांना साडी नेसणे खूप सोपे आहे. परंतु नवीन पिढीला ही मोठी समस्या वाटते. खरं तर तरुणींना साडी नेसायला प्रचंड आवडते पण त्यांना साडी नेमकी कशी नेसायची हे माहीत नसते. साडी नेसताना सगळ्यात मोठी अडचण असते ती त्याच्या प्लीट्स अर्थातच निऱ्या करण्यात. आज आपण साडी नेसताना कोणत्या चुका टाळायला हव्या ते पाहणार आहोत.
साडी हा एक भारतीय लोकप्रिय पोशाख आहे हे आपल्या सर्वांनाच माहितेय. आणि जवळजवळ प्रत्येक स्त्रीला ती नेसायला आवडते. पण हिरोईनसारखा लूक मिळावा म्हणून कधी कधी साडी नेसताना स्त्रिया साडीत विविध प्रयोग करतात. त्यामुळे नको असलेल्या चुका होतात. अशा स्थितीत सुंदर दिसण्याऐवजी संपूर्ण लुकच खराब होतो. तुम्हालाही साडी नेसायची असेल तर या छोट्या चुका पुन्हा करू नका. शिवाय या टिप्स फॉलो करून साडी नसल्यास एखाद्या अभिनेत्रीसारखा परफेक्ट लूक तुम्हाला मिळेल.
साडीमध्ये एकप्रकारचा लय दिसणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे साडीत जास्त पिन लावू नका. खांद्यावर प्लीट्स आणि कंबरेवर प्लीट्स सेट करण्यासाठी एक ते दोन पिन पुरेसे आहेत. जर साडी जड असेल तर खांद्यावर दोन पिन एकत्र लावा. आणि साडीच्या प्लीट्स बनवल्यानंतर त्या कंबरेला पिन करा आणि नंतर पेटीकोटमध्ये खोचून घ्या. यामुळे, तुमचे प्लीट्स अधिक सहज राहतील आणि साडी फ्लोई म्हणजेच लयबद्ध दिसेल.
साडीमध्ये परफेक्ट दिसण्यासाठी विविध गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच साडीसोबत ब्लाउजच्या फिटिंगकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. जर ब्लाउजची नेकलाइन कमी असेल किंवा नीट बसत नसेल तर साडीचा पदर त्यावर स्थिर राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण वेळ अस्वस्थ वाटेल. आणि तुम्ही गोंधळल्यासारखे वाटलं. शिवाय कार्यक्रमात वावरताना तुमचा आत्मविश्वास कमी होईल. सारखे लक्ष त्या पदराकडे लागून राहील. त्यामुळे ब्लाउज पूर्णपणे फिटिंगचा असावा. जास्त घट्ट किंवा जास्त सैल नसावा.
तुमच्या साडी लूकमध्ये साडी आणि ब्लाउजसोबतच परकरही तितकीच महत्वाची भूमिका बजावतो. साडीचे फॅब्रिक जाड असले तरी नेहमीच मॅचिंग परकर परिधान करावा. त्यामुळे साडीतून परकर उठून दिसण्याची शक्यता कमी होईल. शिवाय साडीच्या फॅब्रिकसह परकरच्या गुणवत्तेचीही पूर्ण काळजी घ्यावी. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो.
साडी नेसणे ही देखील एक कला आहे. जर तुम्ही रोज साडी नेसत असाल तर काही हरकत नाही. पण जर तुम्ही पहिल्यांदाच साडी नेसणार असाल तर ती खूप उंच किंवा खूप कमी नेसणार नाही याची काळजी घ्या. जर तुम्हाला साडीची लांबी आणि प्रवाह परफेक्ट हवा असेल तर साडी उजवीकडे नाभीला बांधा. याच्या मदतीने तुमची साडी जास्त स्कीन रिव्हलिंग दिसणार नाही किंवा ती जास्त उंचही दिसणार नाही. खूप कमी उंचीमध्ये साडी नेसल्यानेही तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते आणि साडी सैल होण्याची भीतीदेखील असते.
संबंधित बातम्या