मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care: वापरलेली चहापत्ती फेकू नका, चेहरा चमकवण्यासाठी अशा प्रकारे वापरा

Skin Care: वापरलेली चहापत्ती फेकू नका, चेहरा चमकवण्यासाठी अशा प्रकारे वापरा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 18, 2024 01:44 PM IST

Glowing Skin: आपल्या किचनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा वापर आपण चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी करु शकतो. यापैकी एक म्हणजे चहापत्ती. वापरलेली चहापत्ती फेकून देऊ नका तर तुम्ही त्याला चेहऱ्यावर वापर करू शकता. कसे ते जाणून घ्या.

स्किन केअरमध्ये वापरलेली चहापत्ती वापरण्याची पद्धत
स्किन केअरमध्ये वापरलेली चहापत्ती वापरण्याची पद्धत

Tips to Use Leftover Tea Leaves: चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी विविध घरगुती उपाय केले जातात. यासाठी स्वयंपाकघरातील अनेक गोष्टी वापरल्या जातात. अशीच एक प्रभावी गोष्टी म्हणजे चहापत्ती. चहा केल्यानंतर उरलेली चहापत्ती सहसा फेकून दिली जाते. पण तुम्हाला माहित आहेका की या वापरलेल्या चहापत्तीचा स्किन केअरमध्ये वापर केल्यास तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. जर तुम्ही त्याचा योग्य वापर केला तर तुम्हाला एक आश्चर्यकारक फरक दिसेल. जाणून घ्या ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी चहापत्ती कशी वापरावी आणि त्याचे फायदे.

ट्रेंडिंग न्यूज

डाग होतील दूर

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी चहापत्तीचा वापर करा. डाग, सुरकुत्या, ओपन पोर्सचा सामना करण्यास मदत करेल. ते वापरण्यासाठी मिक्सरमध्ये चहापत्ती सोबत एलोवेरा जेल टाकून बारीक करा. ते तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा.

भेगा पडलेल्या टाचांसाठी वापरा

टाचांना भेगा पडण्याची समस्या सामान्य आहे, जी हिवाळ्यात वाढते. हे डेड स्किन आणि घाण यामुळे घडते. या समस्येचा सामना करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही उरलेली चहापत्ती वापरू शकता. यासाठी चहापत्ती धुवून त्यात ओट्स आणि खोबरेल तेल मिक्स करा. आता याने टाचांना नीट स्क्रब करा. स्क्रबिंगच्या चांगल्या रिझल्टसाठी प्रथम पाय कोमट पाण्यात बुडवा आणि नंतर स्क्रब करा.

गुडघे आणि कोपरांचा काळेपणा होईल दूर

काळे गुडघे आणि कोपर साफ करण्यासाठी तुम्ही चहापत्तीचा वापर करू शकता. सर्वप्रथम वापरलेली चहापत्ती उन्हात वाळवा. नंतर बारीक करून त्यात बेकिंग सोडा मिक्स करा. हे नीट मिक्स झाल्यानंतर कोपर आणि गुडघे नीट घासून घ्या. त्याच्या नियमित वापराने तुम्हाला फरक दिसेल.

 

शरीर स्वच्छ करा

वापरलेल्या चहापत्तीपासून तुम्ही बॉडी स्क्रब बनवू शकता. यासाठी ते पाण्याने स्वच्छ करा आणि नंतर गाळून घ्या. आता त्यात तेल मिक्स करा आणि नंतर बॉडी स्क्रब करा. हे स्क्रब डेड स्किन काढून टाकण्यास मदत करेल. तुमच्या स्किनसाठी हे उत्तम काम करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग