New Born Baby Care: कडाक्याच्या थंडीत अशी घ्या न्यू बॉर्न बेबीची काळजी, उपयुक्त आहेत या टिप्स-follow these tips to take care of new born baby during winter ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  New Born Baby Care: कडाक्याच्या थंडीत अशी घ्या न्यू बॉर्न बेबीची काळजी, उपयुक्त आहेत या टिप्स

New Born Baby Care: कडाक्याच्या थंडीत अशी घ्या न्यू बॉर्न बेबीची काळजी, उपयुक्त आहेत या टिप्स

Jan 03, 2024 11:00 PM IST

Parenting Tips: जानेवारी मध्ये थंडी वाढते. अशावेळी नवजात बाळाची काळजी घेण्यासाठी या काही टिप्स फॉलो करता येतात.

हिवाळ्यात नवजात बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स
हिवाळ्यात नवजात बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Take Care of New Born Baby: थंडीच्या दिवसात प्रत्येकाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातही नवजात बालकांची जास्त काळजी घेणे आवश्यक असते. न्यू बॉर्न बेबीची रोगप्रतिकार शक्ती खूप कमकुवत असते. त्यामुळे जर त्यांची काळजी घेतली नाही तर तर त्याला न्यूमोनिया, संक्रमण आणि हंगामी फ्लू होण्याचा धोका जास्त असतो. शिवाय त्यांची त्वचा सुद्धा खूप नाजूक असल्याने ती जास्त कोरडी होणे, पुरळ येणे अशा समस्या होऊ शकतात. हिवाळ्यात नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या टिप्स तुम्हाला मदत करतील.

सर्वात आवश्यक आहे उन

सूर्य हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. बाळाला आंघोळ घातल्यानंतर त्याला थोडावेळ उन्हात ठेवले पाहिजे. सूर्यकिरण जंतू नष्ट करतात आणि शरीराला उष्णता देतात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी कोवळ्या उन्हात बाळाला घेऊन बसले पाहिजे.

दिवसातून दोनदा करा मालिश

हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे सामान्य आहे. हवेतील आर्द्रतेमुळे लहान मुलांची त्वचा सुद्धा कोरडी आणि रफ बनते. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात बाळाला मालिश करायला विसरु नका. तुम्ही दिवसातून दोनदा सुद्धा मालिश करु शकता. तेल शरीराच्या सर्वात खोल ऊतींमध्ये शोषले जाते आणि त्यांना मॉइश्चरायइझ ठेवते. यासोबतच तेल लावल्याने मुलांची हाडे मजबूत होतात.

हायजीन करा मेंटेन

तसं तर हायजीन मेंटेन करण्यासाठी स्वच्छता आणि आंघोळ करणे खूप महत्त्वाचे आहे. पण कडाक्याच्या थंडीत बाळासाठी हे टाळता येते. तुम्ही बाळाला एक किंवा दोन दिवस आड गरम पाण्याने आंघोळ घालू शकता. इतर दिवशी बाळाचे शरीर फक्त ओल्या टॉवेलने पुसून कपडे बदला. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी होईल आणि त्वचेची आर्द्रताही चांगली राहील.

 

कपड्यांचे लेअरिंग करा

लहान मुलांना नेहमी लेयरिंगमध्ये कपडे घाला. हे थंड वातावरणात त्यांना उबदार ठेवण्यास मदत करेल. टोपी, जॅकेट आणि उबदार बूट मुलांसाठी आवश्यक आहेत. बाळाचे डोके झाकण्यास विसरू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)