Kitchen Tips: किचनमध्ये तेल सांडलं का? अशा प्रकारे मिनिटात करा स्वच्छ, खराब होणार नाही कापड
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: किचनमध्ये तेल सांडलं का? अशा प्रकारे मिनिटात करा स्वच्छ, खराब होणार नाही कापड

Kitchen Tips: किचनमध्ये तेल सांडलं का? अशा प्रकारे मिनिटात करा स्वच्छ, खराब होणार नाही कापड

Published Jul 29, 2024 11:17 AM IST

Cleaning Tips in Marathi: अनेकदा स्वयंपाक करताना तेल जमिनीवर सांडतं किंवा स्वयंपाकघरात तेलाचे डाग पडतात. हे तेल स्वच्छ करण्यासाठी कापड घाण करण्याची गरज नाही, फक्त या एका ट्रिकने सर्व तेल पटकन स्वच्छ करता येईल.

किचनमध्ये सांडलेले तेल स्वच्छ करण्यासाठी टिप्स
किचनमध्ये सांडलेले तेल स्वच्छ करण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Remove Oil From Floor or Kitchen Slab: स्वयंपाकघरात काम करत असताना खाण्या-पिण्याच्या काही गोष्टी फरशीवर किंवा किचन ओट्यावर सांडतात. ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कपड्याचा वापर करता. पण कधी तेल सांडलं तर ते साफ करणं सगळ्यात त्रासदायक वाटतं. कारण कापडाने कितीही स्वच्छ केले तरी तेलाचा चिकटपणा टिकून राहते. आणि दुसरं म्हणजे तेलामुळे कपडेही घाणेरडे होतात. अशा वेळी किचन ओट्यावर पडलेल्या तेलाचे डाग असो वा फरशीवर सांडलेले तेल, हे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही संपूर्ण स्वयंपाकघर सहज स्वच्छ होते.

फरशीवर सांडलेले तेल कसे स्वच्छ करावे

जमिनीवर किंवा फरशीवर सांडलेले तेल स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. फक्त एक सोपी ट्रिक काही मिनिटांत सर्व तेल पुसून टाकेल. जर जमिनीवर किंवा किचन ओट्यावर तेल सांडले असेल तर तेलावर फक्त पीठ शिंपडा. जर भरपूर तेल सांडले असेल तर भरपूर पीठ टाकायची गरज नाही, थोडेसे टाका. जेवढे तेल सांडले आहे ते पूर्णपणे पिठाने कव्हर करा. यानंतर साधारण पाच मिनिटे राहू द्या. या काळात पीठ तेल पूर्णपणे शोषून घेईल. आता फक्त एखादे वर्तमानपत्र किंवा टिश्यू पेपरच्या साहाय्याने पीठ गोळा करा. तुम्हाला दिसेल की पिठाबरोबर तेलही पूर्णपणे गोळा होत आहे आणि अगदी सहजपणे संपूर्ण तेल साफ होईल. आता दुसऱ्या स्वच्छ टिश्यू किंवा कागदाने पुन्हा एकदा पुसून टाका. तेल पडलेल्या ठिकाणी ग्रीस किंवा चिकटपणा सुद्धा शिल्लक राहणार नाही.

किचन ओट्यावरील तेलाचे डाग कसे स्वच्छ करावे

जर स्वयंपाक करताना किचन गॅस भोवती जास्त प्रमाणात तेल उडून त्याचे डाग पडले असेल तर किंवा ओट्याच्या कडांवर ग्रीस, चिकटपणा जमा झाला असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी त्यावर पावडर शिंपडा. आता हे पाच ते दहा मिनिटे राहू द्या. हे सर्व तेल शोषून घेईल, नंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्या. यामुळे तुमचे स्वयंपाकघरातील कापडही ग्रीसमुळे खराब होणार नाहीत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पावडरऐवजी पीठ देखील वापरू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner