Tips to Overcome Hangover: ख्रिसमस पार्टीचा हँगओव्हर आहे? आराम मिळवण्यासाठी या टिप्स करा फॉलो!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tips to Overcome Hangover: ख्रिसमस पार्टीचा हँगओव्हर आहे? आराम मिळवण्यासाठी या टिप्स करा फॉलो!

Tips to Overcome Hangover: ख्रिसमस पार्टीचा हँगओव्हर आहे? आराम मिळवण्यासाठी या टिप्स करा फॉलो!

Published Dec 26, 2023 10:18 AM IST

Christmas 2023: पार्टीनंतर तुम्हालाही हँगओव्हर जाणवत असेल तर हँगओव्हर उतरवण्यासाठी काही ट्रिप्स फॉलो करा.

Follow these tips to get relief from Christmas party hangover
Follow these tips to get relief from Christmas party hangover (Freepik)

Home Remedies to Overcome a Hangover: काल भारतात ख्रिसमसचा सण मोठ्या जल्लोशात साजरा झाला. अनेक ठिकाणी मोठ्या थाटामाटात सेलिब्रेशन झालं. ख्रिसमस पार्टी तर अनेकांनी केली असेल. घरची पार्टी असो किंवा बाहेरची पार्टी, लोकांना नाचायला, गाणं, खाणं-पिणं खूप आवडतं. पार्टीत दारू दिली जाणार असेल तर हँगओव्हर होण्याची पूर्ण शक्यता असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जोर धरतो आणि दिवसभर एक विचित्र अनुभव येतो. पार्टीनंतर तुम्हालाही हँगओव्हर जाणवत असेल.  तर मद्यपान केल्यानंतर हँगओव्हर उतरवण्यासाठी काही ट्रिप्स फॉलो करणे गरजेचं आहे.

असा उतरावा पार्टीचा हँगओव्हर

आहारात फळांचा समावेश करा

हँगओव्हर उतरवण्यासाठी सफरचंद आणि केळी खा. सफरचंद आणि केळी हे हॅंगओव्हरपासून मुक्त होण्यासाठी उत्तम फळं आहेत. हॅंगओव्हरमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून सफरचंद आराम देईल.

अद्रक करेल मदत

औषधी गुणांनी समृद्ध अद्रक हे अनेक गुणांनी भरलेलं आहे. अद्रक अल्कोहोल लवकर पचवते, ज्यामुळे हँगओव्हर लवकर कमी होण्यास मदत होते.

पुदीना देखील आहे प्रभावी

हँगओव्हरचा त्रास होत असेल तर गरम पाण्यात ३-४ पुदिन्याची पाने टाकून प्या, आराम मिळेल. पुदिना पोटाच्या समस्या दूर करेल आणि आतड्यांना आराम देईल. हँगओव्हरपासून मुक्त होण्यासाठी पुदिना हे एक प्रभावी औषध आहे.

मधाचे सेवन करा

मधामध्ये अल्कोहोलचे दुष्परिणाम कमी करण्याचे गुणधर्म आहेत. मध मेटाबोलिज्म वाढवते ज्यामुळे पचन सुधारते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner