Sharara Style Tips: कोणताही सण म्हटला की मुलींना तयार होण्यासाठी एक कारण मिळते. ईदला मुली स्टायलिश दिसण्यासाठी वेगवेगळे ड्रेस घालतात. ईदच्या निमित्ताने मुलींना शरारा घालायला आवडते. आजकाल शरारा फारच फॅशनमध्ये आहे. मुलींना विविध डिझाईनच्या कुर्ती आणि शरारा पँट घालायची असतात. पण जर तुम्हाला शरारा घालून सुंदर दिसायचे असेल तर या स्टाइल टिप्स नक्की फॉलो करा. जेणेकरून प्रत्येक जण फक्त तुमच्या लूकची प्रशंसा करेल. चला तर मग जाणून घेऊया शरारा घालून तयार होताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
शरारासोबत दुपट्टा कॅरी करताना काही स्टाइल नक्कीच फॉलो करा. दुपट्टा फक्त दोन्ही खांद्यावर किंवा एकाच खांद्यावर घेण्याऐवजी एका खांद्यावर दुपट्टा ओपन स्टाईलमध्ये फिक्स करा आणि दुसऱ्या हातावर दुपट्टा ठेवा. ही स्टाईल आकर्षक लुक देईल. तुमचा शरारा सिंपल असेल तर तुम्ही तो ओपन करुन दोन्ही खांद्यावरून फॉलिंग घेऊ शकता. दुपट्टाची स्टाईल तुमचा लूक आणखी आकर्षक बनवते.
शराराच्या हलक्या किंवा हेवी एम्ब्रॉयडरीनुसार केसांना सेट करा. कुर्त्याच्या नेकलाइनवर आणि पाठीवर भारी भरतकाम असेल तर लो मेसी बन सुंदर दिसेल. जर कुर्ता साधा असेल तर व्हेवी ओपन हेअर तुम्हाला परफेक्ट लुक देईल. शरारा घालताना हेअरस्टाईलची विशेष काळजी घ्या. हेअरस्टाईल तुमचा लुक अधिक आकर्षक बनवते.
जर तुम्ही जुल नेकलाइन किंवा व्ही नेकलाइन घालत असाल तर तुम्ही लांब कानातले किंवा स्टड्स निवडू शकता. तर राउंड नेकलाइनसोबत नेकपीस देखील पेअर करता येते. शरारावर कशाप्रकारचे वर्क आहे त्यानुसार ज्वेलरी निवडा. जास्त हेवी वर्कसोबत हेवी ज्वेलरी तुमचा लुक खराब करू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या