Hangover Overcome: न्यू ईयर पार्टीच्या हँगओव्हरने वर्षाचा पहिला दिवस नका करू खराब, डोकेदुखीपासून मुक्ती देतील या टिप्स-follow these tips to get over from new year party hangover ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hangover Overcome: न्यू ईयर पार्टीच्या हँगओव्हरने वर्षाचा पहिला दिवस नका करू खराब, डोकेदुखीपासून मुक्ती देतील या टिप्स

Hangover Overcome: न्यू ईयर पार्टीच्या हँगओव्हरने वर्षाचा पहिला दिवस नका करू खराब, डोकेदुखीपासून मुक्ती देतील या टिप्स

Dec 31, 2023 07:29 PM IST

New Year 2024 Party Hangover: नवीन वर्षाची पार्टी म्हटली की डान्स, मजा मस्तीसोबत ड्रिंक पण आलेच. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हँगओव्हर होतो. पार्टीनंतर यापासून आराम मिळवण्यासाठी या टिप्स तुमची मदत करतील.

हँगओव्हर कमी करण्यासाठी टिप्स
हँगओव्हर कमी करण्यासाठी टिप्स (freepik)

Tips to Get Over From New Year Party Hangover: नवीन वर्षाच्या पार्टीत जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हँगओव्हरची समस्या होते. जर तुम्हाला नवीन वर्षाचा पहिला दिवस डोकेदुखीने नाही तर आनंदाने करायची असेल तर न्यू इयर पार्टीला जाण्यापूर्वी हँगओव्हरपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती टिप्स जाणून घ्या. . या टिप्सच्या मदतीने तुम्ही फक्त नवीन वर्षाची पार्टी एन्जॉय करू शकणार नाही तर नवीन वर्षाची सुरुवातही उत्साहाने आणि आनंदाने कराल. वर्षाचा पहिला दिवस जो प्रत्येक व्यक्तीला सुंदर बनवायचा असतो, तो खराब होतो जेव्हा लोक न्यू ईयर पार्टीच्या दुसऱ्या दिवशी हँगओव्हरची तक्रार करू लागतात. हँगओव्हर हे जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे होतो. ते उतरवणे कधी कधी मोठे आव्हान बनते. तुम्हालाही दरवर्षी नवीन वर्षाच्या पार्टीनंतर हँगओव्हरचा त्रास होत असेल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी हे प्रभावी उपाय जाणून घ्या.

भरपूर पाणी प्या

मद्यपान केल्यानंतर पुरेसे पाणी प्यावे. खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स असलेले पाणी प्यायल्यास ते अधिक चांगले असेल. अल्कोहोल प्यायल्यानंतर एखाद्या व्यक्तीला वारंवार लघवी, उलट्या, थकवा किंवा घाम येणे यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. हे टाळण्यासाठी दारू पिण्यापूर्वी आणि नंतर भरपूर पाणी प्या. असे केल्यावरही जर दुसऱ्या दिवशी सकाळी हँगओव्हर कायम असेल तर पुन्हा पाणी प्या.

लिंबू पाणी

लिंबूपाणी आणि लिंबूवर्गीय फळे देखील हँगओव्हर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. दोन्ही पदार्थांमध्ये असलेले जीवनसत्त्वे, पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स पोटातील विषारी घटकांशी लढतात. हे हँगओव्हरपासून आणि डोकेदुखीपासून आराम देतात.

नारळ पाणी

अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीरात कोरडेपणा येतो. तो दूर करण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरू शकते. नारळाच्या पाण्यात साखर आणि कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असते. तसेच नारळ फॅट फ्री देखील आहे. इतकेच नाही तर खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सने युक्त नारळाचे पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि हँगओव्हरही सहज निघून जातो.

केळी

हँगओव्हर कमी करण्यासाठी केळी देखील एक चांगला उपाय असू शकतो. कारण दारू प्यायल्यानंतर शरीरात पोटॅशियमची कमतरता होते. पण केळीमध्ये पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील ही कमतरता पूर्ण करतात.

 

आल्याचा चहा

हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा चहा घेऊ शकता. हा उपाय करण्यासाठी चहा बनवताना थोडे आले टाका. तसेच मीठासोबत कच्चे आले खाल्ल्याने सुद्धा ही समस्या दूर होऊ शकते.

कोमट पाणी

हँगओव्हरपासून मुक्त होण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करणे देखील फायदेशीर ठरू शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग