Chanakya Niti in Marathi: यशाशी मैत्री ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. पण यश प्रत्येकाला मिळतेच असे नाही. आयुष्यात झालेल्या छोट्या-छोट्या चुका तुम्हाला यशापासून खूप दूर नेऊ शकतात. अशा वेळी तुम्हालाही आयुष्यातील अपयश टाळायचे असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन करून अपयशाच्या निराशेपासून स्वत:ला वाचवू शकता. जीवनात नेहमी आघाडीवर राहण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो कराव्या हे जाणून घ्या.
आत्मविश्वासाच्या बळावर माणूस अत्यंत अवघड कामात आणि परिस्थितीत सहज मार्ग काढतो. आचार्य चाणक्य यांच्या मते आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही अपयशी होऊ देत नाही. आत्मविश्वास असेल तर माणसाला कोणीही हरवू शकत नाही.
ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीची खरी मैत्रीण असते. आचार्य चाणक्य यांच्या मते पुस्तकी ज्ञान असो किंवा कोणतेही काम करण्याचा अनुभव, व्यक्तीचे ज्ञान कधीही वाया जात नाही. ज्ञानी व्यक्ती आयुष्यात कधीच अपयशी होत नाही.
माणूस आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करू शकतो. व्यक्तीला त्याच्या मेहनतीचे फळ उशिरा का होईना पण कधीतरी मिळतेच. आचार्य चाणक्य यांच्या मते कठोर परिश्रम हा यशाचा मूळ मंत्र आहे.
आजच्या काळात माणसाच्या अपयशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याने कच्च्या कानाचे असणे आहे. लोक एकमेकांच्या बोलण्यात येऊन रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतात. असे केल्याने ते स्वत:चे नुकसान करतात. अशा वेळी त्या व्यक्तीने कधीही कच्च्या कानाचे असू नये.
जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत डोळे आणि कान उघडे ठेवतो, सोप्या शब्दात सांगायचे तर सतर्क असतो, त्याला कधीही अपयशाला सामोरे जावे लागत नाही. याशिवाय आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीला पैशाचा सदुपयोग करण्याचा देखील सल्ला दिला. ज्याला पैशाचा चांगला वापर कसा करायचा हे माहित आहे आणि वाईट काळासाठी पैसा सांभाळून ठेवतो तो देखील आयुष्यात अपयशी होत नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)