Parenting Tips: सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स आवर्जून करा फॉलो!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parenting Tips: सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स आवर्जून करा फॉलो!

Parenting Tips: सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स आवर्जून करा फॉलो!

Published Sep 14, 2023 07:24 PM IST

Sudha Murty: सुधा मूर्ती यांच्या पालकत्वाच्या टिप्स आधुनिकता आणि परंपरा या दोन्हींवर आधारित आहेत. ज्या पालकांनी नक्कीच अवलंबल्या पाहिजेत.

Parenting Tips in Marathi
Parenting Tips in Marathi (Instagram & Freepik )

Sudha Murty Parenting Tips: अभियंता, सामाजिक कार्यकर्त्या, देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त सुधा मूर्ती या देखील दोन मुलांची आई आहेत. एकीकडे पालकत्वामध्ये पारंपारिकतेचा समावेश करू इच्छिणाऱ्या आणि दुसरीकडे आपल्या मुलांना आधुनिकतेच्या बरोबरीने आणू इच्छिणाऱ्या नवीन वयातील पालकांनी मूर्तीच्या पालकत्वाच्या तंत्राचे नेहमीच कौतुक केले आहे. सुधा मूर्ती यांचा पालकत्वाचा सल्ला आधुनिकता आणि परंपरा या दोन्हींवर आधारित आहे. चला तर मग सुधा मूर्तीच्या पालकत्वाच्या टिप्स जाणून घेऊयात...

फॉलो करा या टिप्स

> सुधा मूर्तींच्या मते, मुलांची तुलना इतर मुलांशी कधीही करू नये. कारण प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. असे केल्याने त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

> मुलांना त्यांच्या वयानुसार जबाबदाऱ्या देण्यास सुरुवात केली पाहिजे. यामुळे मुलांची निर्णय क्षमता चांगली होती. याशिवाय त्यांच्यातला समजूतदारपणाही विकसित होतो.

Parenting Tips: प्रत्येक आईने आपल्या मुलांना या ५ गोष्टी आवर्जून शिकवायलाच हव्यात!

> त्याचबरोबर मुलांशी नेहमी संवाद साधत राहा. संवादाच्या अभावामुळे मुले आणि पालक यांच्यात अंतर निर्माण होते. याशिवाय पैशाची किंमत मुलांना जरूर सांगावी. गरज जाणून घेतल्याशिवाय त्याला पैसे देऊ नका.

> पालकांनी मुलांना पुस्तके देऊन त्यांचे वाढते गॅजेट व्यसन कमी करावे. पुस्तकांची मैत्री त्यांचे ज्ञान वाढवून त्यांना एक चांगली व्यक्ती बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner