Tips and Tricks: थंडीत कपड्यांना खराब वास येतोय? दूर करण्यासाठी ट्राय करा या पद्धती
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tips and Tricks: थंडीत कपड्यांना खराब वास येतोय? दूर करण्यासाठी ट्राय करा या पद्धती

Tips and Tricks: थंडीत कपड्यांना खराब वास येतोय? दूर करण्यासाठी ट्राय करा या पद्धती

Jan 09, 2024 11:07 PM IST

Kitchen Tricks: हिवाळ्यात कडक ऊन नसल्यामुळे कपडे नीट सुकत नाहीत. त्यामुळे त्याचा वास येऊ लागतो. कपड्यांना येणारा खराब वास दूर करण्यासाठी हे उपाय करा.

हिवाळ्यात कपड्यांचा वास दूर करण्यासाठी टिप्स
हिवाळ्यात कपड्यांचा वास दूर करण्यासाठी टिप्स (freepik)

Tips To Remove Smell From Clothes in Winter: थंडीच्या दिवसांमध्ये कडक ऊन नसते. अनेक वेळा लोकांना ऊन पाहायला पण मिळत नाही. जेव्हा ऊन नसते तेव्हा लोकांना सर्वात मोठी समस्या भेडसावत असते ती म्हणजे कपडे वाळवणे. हिवाळ्यातील कपडे जाड असतात. त्यामुळे त्यांना जास्त सूर्यप्रकाश लागतो. अशा परिस्थितीत जेव्हा कपडे व्यवस्थित सुकत नाहीत तेव्हा दुर्गंधीची समस्या सुरू होते. त्यातून दुर्गंधी येत असल्याने कपडे घालणे अवघड होते. या वास काढण्यासाठी तुम्ही या पद्धतींचा अवलंब करू शकता.

धुण्याआधी या पद्धतीचा अवलंब करा

अनेकदा ओल्या कपड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात. त्यामुळे दुर्गंधी येत आहे. अशा परिस्थितीत धुतलेले कपडे आणि धुवायचे कपडे एकत्र करू नये. कपडे धुण्यापूर्वी त्यांना हवा द्या.

बेकिंग सोडा वापरा

बेकिंग सोडा खराब वास दूर करण्यास मदत करेल. खराब वास येत असल्यास रात्री कपड्यांवर बेकिंग सोडा शिंपडा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या. नंतर सकाळी ते नीट झटकून घ्या आणि काही वेळ हवेत वाळवा.

कपडे धुण्यासाठी उपयोगी पडतील या गोष्टी

वॉशिंग मशिनमध्ये कपडे स्वच्छ करताना तुम्ही गुलाब पाणी, चमेलीचे तेल किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही सुगंधित तेल वापरू शकता. त्यामुळे कपड्यांना चांगला वास येईल.

कपडे व्यवस्थित सुकवा

जेव्हा सूर्यप्रकाश पडत नाही तेव्हा घरात कपडे सुकवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घराच्या आत दोरी लावा आणि मग कपडे वाळवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खोलीत पंखा लावून कपडे पसरवून वाळवू शकता. यामुळे ते लवकर कोरडे होतील आणि वास येणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner