Ceiling Fan Cleaning Tips: सीलिंग फॅन स्वच्छ करणे देखील महत्वाचे आहे. उन्हाळ्यात सतत पंखा सुरू असल्याने त्यावर बरीच धूळ साचते. ज्यामुळे पंख्याची स्पीड कमी होते आणि ते हळूहळू चालते. पंख्याच्या पात्यांवरील धूळ साफ केल्यास पंखा तर चमकतोच, शिवाय पंख्याचा वेग कसा वाढवायचा हा प्रश्नही सुटतो. पण पंखा साफ करण्यासाठी स्टूल आणि शिडी नसेल तर काय करायचं? अशा वेळी हे हॅक तुम्हाला मदत करू शकते. यामुळे काही मिनिटांत पंखा पूर्णपणे साफ होईल.
पंख्यावर धूळ जमा झाली आणि घरात शिडी किंवा स्टूल सारख्या गोष्टी नाहीत, ज्यावर चढून साफसफाई करता येईल तर काळजी करू नका. अनेकदा उंच गोष्टीवर चढून एकटे साफसफाईसाठी करताना पडण्याची भीतीही असते. अशावेळी ही ट्रिक तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. पंखा स्वच्छ करण्यासाठी फक्त एक काम करा.
पंखा साफ करण्यासाठी फक्त एक लहान क्लीनिंग इक्विपमेंट तयार करा. हे बनवण्यासाठी जुने हँगर आणि वायपरची गरज आहे. हँगरचा मोडलेला भाग सरळ करा. वायपरच्या मागच्या बाजूला, जिथे प्लॅस्टिकची कॅप जोडलेली असते, तिथे हँगर गरम करून त्या प्लॅस्टिकमध्ये फिक्स करा. आता हँगरच्या सर्व तारांवर स्पंज किंवा जुने कापड चांगले गुंडाळा. जेणेकरून पंख्याची पाते मधोमध अडकवून स्वच्छ करता येतील.
स्पंज गुंडाळण्यासाठी एखाद्या दोरीचा वापर करा आणि त्याच्या मदतीने हँगरच्या तारेच्या चारही बाजूने ते गुंडाळा. तयार आहे तुमचे पंखा आणि खिडकी साफ करणारे इक्विपमेंट. याच्या मदतीने हात लांब करून पंखा सहज साफ करता येतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)