Tips to Style Saree Like Actress: फक्त अभिनयच नाही तर आपल्या स्टाईलसाठीही अनेक अभिनेत्री फॅन्सच्या पसंतीस उतरतात. लोक आपल्या आवडत्या अभिनेत्रींसारखे दिसण्यासाठी बरेच प्रयत्न करतात. अभिनेत्रींच्या साडीतील लुक्सबद्दल बोलायचे झाले तर ते अधिक पसंत केले जातात. तुम्हालाही साडी नेसून अभिनेत्रींप्रमाणे सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही त्यांच्या काही स्टायलिंग टिप्स फॉलो करू शकता. या टिप्स कोणत्या आहेत ते पाहा.
अभिनेत्री त्यांचा साडी लुक आणखी खास बनवण्यासाठी हेअरस्टाइलकडे विशेष लक्ष देतात. बहुतेक अभिनेत्रींना स्लीक हेअरस्टाइल कॅरी करायला आवडते.
साडी लुक नेहमीच क्लासिक दिसते. पण जर साडी नीट नेसली नाही तर ते तुमचा लूक खराब करू शकते. अभिनेत्री साडी पिनअपकडेही जास्त लक्ष देतात. लूक खास आणि आकर्षक बनवायचा असेल तर साडीच्या पिनअपकडे लक्ष द्यायला हवे.
लूक आकर्षक बनवण्यासाठी अभिनेत्री त्यांच्या दागिन्यांकडे विशेष लक्ष देतात. अशा स्थितीत तुम्ही आकर्षक ईयररिंग्स किंवा नेकपीसही कॅरी करू शकता. जेणेकरून तुमचा लूक चांगला दिसतो. जास्त ज्वेलरी घातल्याने लूक खराब होतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे लुक ओव्हर करणे टाळा.
एखादा सण समारंभ, लग्न अशा ठिकणी साडी नेसताना ती हेवी दिसण्यासाठी मॅचिंग दुपट्टा किंवा शाल कॅरी केले पाहिजे. एलिगंट लुक मिळवण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
अभिनेत्रीसारखे दिसण्यासाठी मेकअपकडे नक्कीच लक्ष द्या. ग्लोइंग लुकवर लक्ष केंद्रित करा. यासोबतच आकर्षक लुकसाठी लिपस्टिककडे विशेष लक्ष द्या. साडीचे मॅचिंग लक्षात घेऊन लिपस्टिक लावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)