मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eid Styling Tips: ईदला दिसायचं आहे अप्सरासारखे सुंदर तर फॉलो करा या स्टायलिंग टिप्स

Eid Styling Tips: ईदला दिसायचं आहे अप्सरासारखे सुंदर तर फॉलो करा या स्टायलिंग टिप्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 09, 2024 08:11 PM IST

Fashion Tips: ईदच्या निमित्ताने महिला स्वतःसाठी योग्य ड्रेस निवडतात. पण स्टायलिंगच्या अभावामुळे लुक खराब होतो. येथे पहा ईदसाठी स्टाइलिंग टिप्स

Eid Styling Tips: ईदला दिसायचं आहे अप्सरासारखे सुंदर तर फॉलो करा या स्टायलिंग टिप्स
Eid Styling Tips: ईदला दिसायचं आहे अप्सरासारखे सुंदर तर फॉलो करा या स्टायलिंग टिप्स

Styling Tips for Eid: ईदची प्रतीक्षा आता संपणार आहे. रमजानचा पवित्र महिना आता संपणार असून ११ एप्रिलला सर्व जण ईद साजरी करणार आहेत. ईद आली की महिलांना सर्वाधिक आनंद होतो. कारण त्यांना सुंदर तयार होण्याची संधी मिळते. ईदच्या दिवशी स्त्रिया नवीन कपडे घालतात आणि चांगली तयारी करतात. ईद येण्याआधीच महिला नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी जातात. मात्र जेव्हा तयारी करायची असते तेव्हा तयारी कशी करावी या संभ्रमात पडतात.  आउटफिट कितीही सुंदर असला पण जर स्टाईल नीट नसेल तर तुमचा लुक खराब होतो.  अशा परिस्थितीत तुम्ही अभिनेत्रींकडून काही स्टाइलिंग टिप्स घेऊ शकता. या टिप्स फॉलो करून तुम्ही सुंदर दिसू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

पासा आणि मांग टिक्का तुमचा ईद लुक खास बनवतील

तुम्हाला ईदला हेवी लुक हवा असेल तर पासा आणि मांग टिक्का समाविष्ट करा. ए-लाइन किंवा अनारकली सूटसह ते छान दिसते. तुम्ही ईद पार्टीला जात असाल तर तुमच्या लूकमध्ये या ऍक्सेसरीचा नक्कीच समावेश करा. प्रत्येकजण तुमच्या लुकची प्रशंसा करेल.

दुपट्ट्याला व्यवस्थित स्टाईल करा

बहुतेक स्त्रिया ईदच्या दिवशी सूट घालतात. अशा परिस्थितीत सूटचा दुपट्टा व्यवस्थित स्टाईल करणे गरजेचे आहे. तुम्ही दुपट्ट्याने डोके कव्हर करू शकता. याशिवाय तुम्ही दुपट्ट्याला बेल्टनेही कव्हर करू शकता. हे देखील एक चांगला लुक देईल.

मेकअपमध्ये योग्य लिपस्टिकचा रंग निवडा

लिपस्टिकचा रंग तुमचा लुक बनवू शकतो किंवा खराब करू शकतो. बऱ्याच स्त्रिया हेवी सूटसह डार्क लिपस्टिक लावतात. किंवा डार्क त्वचेच्या टोनवर न्यूड लिपस्टिक लावतात. यामुळे लूकही खराब होऊ शकतो. योग्य रंगाची लिपस्टिक निवडणे महत्त्वाचे आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग