Tips to Make Perfect Stuffed Paratha: नाश्ता असो वा डिनर बटाटा, पनीर, कोबी, डाळी अशा विविध गोष्टींनी बनवलेले गरमा गरम स्टफ पराठे खायला सगळ्यांनाच आवडते. पण कधी कधी हे पराठे बनवताना अडचणी येतात जेव्हा ते लाटताना तुटतात आणि त्यातील स्टफिंग बाहेर येऊ लागतात. इतकेच नाही तर बऱ्याचदा स्टफ पराठ्यात भरलेले सारण लाटताना एका बाजूला सरकतो. ज्याची चव अजिबात चांगली लागत नाही. स्टफ पराठे बनवताना तुम्हालाही अशी समस्या भेडसावत असेल, तर हे स्मार्ट किचन टिप्स तुमची समस्या दूर करू शकतात. चला जाणून घेऊया परफेक्ट स्टफ पराठा बनवण्यासाठी कुकिंग हॅक्स.
स्टफ पराठा सॉफ्ट बनवण्यासोबतच लाटताना तुटू नये यासाठी पीठ मळताना त्यात २ चमचे मैदा आणि १ चमचा तूप मिक्स करा. असे केल्याने स्टफ पराठ्याचे पीठ लाटणे सोपे जाते.
स्टफ पराठा बनवण्यासाठी तुम्ही कोणतीही डाळ किंवा भाजी वापरत असलात तरी सारणमध्ये जास्त ओलावा राहणार नाही याची विशेष काळजी घ्या. सारणमध्ये ओलावा राहिल्यास पराठे लाटताना पीठ लाटण्याला चिकटून पराठा फाटतो.
स्टफ पराठ्याचे सारण बनवताना सारणाच्या शेवटी मीठ घालावे याची विशेष काळजी घ्या. असे न केल्यास भाज्यांना पाणी सुटते आणि सारण ओलसर होईल. त्यामुळे पराठ्याचे पीठ लाटण्याला चिकटते आणि लाटताना फाटू लागते.
जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही स्टफ पराठा बनवण्यासाठी तयार केलेल्या स्टफिंगमध्ये ओलावा आहे तर ओलावा कमी करण्यासाठी पराठा बनवण्यापूर्वी ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. याशिवाय भाज्यांमधला ओलावा कमी करण्यासाठी त्यांना किसून नीट पिळून घ्या आणि नंतर त्यात कॉर्न स्टार्च टाका.
- स्टफ पराठा बनवण्यासाठी स्टफिंग भरुन लाटताना पराठ्याचे कडा आणि मध्ये थोडे जाड ठेवा. असे केल्याने पराठा लाटताना ते फाटून मसाला बाहेर पडत नाही.
- स्टफ पराठा बनवताना पीठ थोडे घट्ट मळून घ्या. घट्ट पिठाने स्टफ पराठा छान आणि मऊ होतो.
- स्टफिंग करताना पराठ्यात सारण हलक्या हाताने दाबून भरा.
- स्टफ केलेला गोळा लाटताना पीठाच्या दोन्ही बाजूंनी मैदा वापरावे. यामुळे पराठा लाटणे सोपे होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)