Tips to Keep Sticky Skin Fresh During Monsoon: आर्द्रता आणि घामामुळे त्वचेवर विविध समस्या उद्भवतात. तथापि, चिकट त्वचा या काळात सर्वात त्रासदायक असते. पावसाळ्यात त्वचा तेलकट होऊ लागते. अशा परिस्थितीत ऑइली स्किन असलेल्या लोकांना अधिक त्रास होतो. अशा वेळी चिकट त्वचेचा सामना करण्यासाठी तुम्ही काही पद्धती फॉलो करू शकता. या पद्धतींचा अवलंब केल्यास त्वचा एकदम फ्रेश होईल. पावसाळ्यात त्वचा फ्रेश ठेवण्यासाठी काही सोप्या पद्धती जाणून घ्या.
मुलतानी माती त्वचेतून अतिरिक्त तेल आणि घाम शोषून घेते. ऑइली स्किन असलेल्यांसाठी हे उत्तम आहे. ते वापरण्यासाठी मुलतानी मातीत अर्धा चमचा चंदन पावडर घाला. मग त्यात गुलाब जल घालून पॅक बनवा. चेहऱ्यावर आणि शरीरावर लावा आणि कोरडे होऊ द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. याच्या वापराने चिकटपणा दूर होईल.
चिकट त्वचेसाठी कोरफड हे एक उत्तम पर्याय आहे. हे त्वचेवर लाव्याने तुम्हाला फ्रेश वाटेल. यामुळे त्वचा तेलमुक्त राहील. याशिवाय त्वचा नेहमीच हायड्रेटेड राहते. याशिवाय एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्याने स्किन टोन लाइट राहते.
कडुनिंब आणि तुळशीमध्ये थंड गुणधर्म असतात जे त्वचा फ्रेश ठेवण्यास मदत करतात. चिकटपणा कमी करण्यासाठी या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. त्याचा वापर करण्यासाठी कडुनिंब आणि तुळशीची पाने पाण्यात उकळून घ्या. नंतर थंड होऊ द्या. आता हे पाणी गाळून घ्या आणि त्याने चेहरा धुवा किंवा आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा.
चिकटपणा दूर करण्यासाठी थंड शॉवरने आंघोळ करण्यापेक्षा चांगले काहीच नाही. हे त्वचा स्वच्छ करते आणि आपल्या शरीराचे तापमान कमी करण्यास देखील मदत करते. थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटतं.
दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आपल्या बॅग किंवा रेफ्रिजरेटरमध्ये कूलिंग मिस्ट ठेवा. गुलाब जल किंवा पुदिना यांसारख्या घटकांनी युक्त कूलिंग मिस्ट त्वरित थंडावा देते. याच्या वापराने त्वचेला आराम मिळतो आणि फ्रेश वाटते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)