Health Care: बदलेल्या लाइफस्टाइलमुळे अनेकजण लठ्ठपणाने त्रस्त आहेत. शहरातील बरेच लोक या समस्येचा सामना करत आहेत. खूप प्रयत्न करूनही हे फॅट कमी होत नसेल तर वेगळ्या पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही वेगळ्या टिप्सचा अवलंब करावा लागेल. खरं तर कधीकधी आपण नकळत अशा काही चुका करतो ज्यामुळे आपले वजन कमी होत नाही. यावरच उपाय म्हणून आम्ही तुम्हाला सोप्या पद्धती सांगत आहोत ज्याद्वारे तुमचे वजन वेगाने कमी होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात या सोप्या टिप्स...
> पहिला बेसिक नियम आहे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ बाजूला काढून ठेवणे गरजेचे असते. प्रत्येक गोष्टीचे प्लांनिंग करा. यामुळे तुमचे वजन कमी करणे सोपे होईल. त्याचा फायदा दीर्घकाळ टिकेल. लक्षात ठेवा की वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दृढनिश्चय करणे आवश्यक आहे.
> आहारासोबतच वजन कमी करण्यासाठी, आपल्याला नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. अगदी योगा आणि मेडिटेशनही नियमित करा. आठवड्यातून एक दिवस जिम आणि योगासनातून सुटीही घ्या. त्याऐवजी एखादा मैदानी खेळ खेळा.
> वजन कमी करण्याची प्लॅन लहान स्टेप्सने करा. यासाठी प्रथम सोपे व्यायाम जसे की चालणे किंवा धावणे यापासून सुरुवात करा. पहिल्याच दिवशी, खूप लांब अंतर चालू नका किंवा धावू नका. सुरुवातीला १ ते २ किलोमीटर चाला. हळू हळू अंतर वाढवा. सोबतच आहारावर नियंत्रण ठेवा. पहिल्याच दिवशी पूर्णपणे आहार बदलू नकात.
> लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला पिझ्झा, बर्गर, तळलेले पदार्थ, अति गोड पदार्थ, जास्त मीठ, जंक फूड, फास्ट फूड, प्रक्रिया केलेले अन्न यांसारखे पदार्थ पूर्णपणे सोडून द्या. हे केल्यास तुम्हाला लवकर प्रभाव दिसेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)