Parenting Tips To Calm Down An Angry Child: वाढती स्पर्धा आणि अन्नातील पोषक तत्वांचा अभाव यामुळे आजकाल मुलांमध्ये तणाव आणि राग वाढतो आहे. यामुळे मुले बहुतेक वेळा चिडचिड करतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर नाराजी व्यक्त करू लागतात. तुम्हालाही तुमच्या मुलाबाबत अशीच तक्रार असेल, तर त्याचा राग शांत करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा.
तुमच्या मुलाचा राग आणि त्याचे मन दोन्ही शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला रागाच्या वेळी एक चांगले कलरिंग बुक देणे. रंग भरल्याने मुलाचे मन रागावलेल्या विचारांपासून विचलित होईल आणि कलरिंग करण्यावर लक्ष केंद्रित करेल.
जर मुल खूप रागावले असेल तर त्याला शांत करण्यासाठी काहीतरी गोड खायला द्या. एका संशोधनानुसार साखर रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. अमेरिकेच्या ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, ठराविक प्रमाणात गोड खाल्ल्याने मन शांत राहण्यास मदत होते.
मुलाला राग आला असेल तेव्हा पालकांनी त्याला मिठी मारली तर त्याच्या भावना बदलतात आणि त्याला बरे वाटते. तुमच्या मुलाने रागाच्या भरात घरातील वस्तू फेकायला सुरुवात केली किंवा एखादी मोठी चूक केली तर त्याला सॉरी म्हणायला शिकवा.
जर तुमचे मूल इतर मुलांपेक्षा जास्त रागावले असेल तर त्याला दीर्घ श्वास घेण्यास आणि पाणी पिण्यास सांगा. यानंतर त्याला १० मोजण्यास सांगा. असे केल्याने त्याचे मन लगेच शांत होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या