Shopping Tips: सणांची शॉपिंग करण्यापूर्वी जाणून घ्या 'या' टिप्स, खूप पैसे वाचतील
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Shopping Tips: सणांची शॉपिंग करण्यापूर्वी जाणून घ्या 'या' टिप्स, खूप पैसे वाचतील

Shopping Tips: सणांची शॉपिंग करण्यापूर्वी जाणून घ्या 'या' टिप्स, खूप पैसे वाचतील

Published Oct 03, 2024 09:39 PM IST

Festive Season: सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. अशा वेळी अनेक वेळा बजेट सुद्धा हलतो. चला तर मग आज जाणून घेऊया अशा काही शॉपिंग टिप्स ज्या या फेस्टिव्ह सीझनमध्ये तुमची बरीच सेव्हिंग करतील.

शॉपिंग टिप्स
शॉपिंग टिप्स (freepik)

Money Saving Tips for Festive Shopping: सणासुदीचा हंगाम सुरू झाला असून त्याबरोबर खरेदीचा काळ सुद्धा सुरू झाला आहे. सणासुदीच्या काळात कपडे, दागिन्यांबरोबरच इलेक्ट्रॉनिक वस्तूही खरेदी केल्या जातात, त्यासाठी भरपूर पैसाही खर्च होतो. अनेकदा सणासुदीच्या काळात होणारी खरेदी बजेटपेक्षा जास्त जाते, त्यामुळे नंतर समस्येला सामोरे जावे लागते. हा फेस्टिव्ह सीझन तुमच्या शॉपिंग बजेटपेक्षा जास्त जाणार नाही, यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी काही शॉपिंग टिप्स घेऊन आलो आहोत. या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास शॉपिंगसोबतच तुम्ही भरपूर पैशांची बचत करू शकाल.

नेहमी लिस्ट बनवून करा शॉपिंग

फालतू खर्च टाळण्यासाठी नेहमी यादी तयार करून खरेदी करावी. किराणा तसेच कपड्यांच्या खरेदीसाठी बाहेर पडताना एक यादी बनवा. यादीमध्ये फक्त त्या गोष्टींचा समावेश करा, ज्याची आपल्याला खरोखर गरज आहे. यादीत अनावश्यक गोष्टींचा समावेश करणे टाळा. यामुळे तुम्ही पैशांची बचत करण्याबरोबरच योग्य वस्तूंची खरेदी ही करू शकाल.

शॉपिंगसाठी कॅश वापरा

आजकाल डिजिटल युग झाले आहे, ज्यामुळे बहुतेक लोक ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करतात. परंतु खरेदीच्या वेळी ऑनलाइन पेमेंटवर अवलंबून राहिल्याने व्यर्थ खर्च होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शक्यतो खरेदीसाठी रोख पैसे घ्या. जेव्हा पैसा मर्यादित असेल तेव्हा खरेदी देखील मर्यादित होईल आणि आपण फालतू खर्च टाळाल.

ऑनलाइन शॉपिंगद्वारे करा परवडणारी खरेदी

जर तुम्हाला या सणासुदीच्या काळात आपल्या बजेटमध्ये शॉपिंग करायची असेल तर यासाठी ऑनलाइन शॉपिंग हा उत्तम पर्याय आहे. सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर अनेक प्रकारच्या ऑफर्स मिळतात, ज्यामुळे चांगली प्रोडक्ट परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध होतात. याशिवाय ऑनलाइन शॉपिंग करताना एकाच प्रोडक्टचे इव्हॅल्युएशन एकाच वेळी अनेक वेबसाईटवर करता येते, जेणेकरून कमीत कमी दरात चांगली उत्पादने खरेदी करता येतील.

वेगवेगळ्या ठिकाणी रेट चेक करा

खरेदीसाठी बाजारात गेला असाल तर एकाच दुकानातून खरेदी करण्यापेक्षा वेगवेगळ्या दुकानातील वस्तूंचे दर जाणून घ्या. अनेकदा एका दुकानात एखादी वस्तू महाग असते, तर तीच वस्तू दुसऱ्या दुकानात अर्ध्या किमतीत मिळते. याशिवाय वेगवेगळ्या ब्रँडच्या उत्पादनांचे दर जाणून घेतल्यानंतरच खरेदी करा. यामुळे कमी पैशात चांगली शॉपिंग करता येते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner