Makeup Tips: डार्क ओठांवर हलक्या रंगाची लिपस्टिक लावता येत नाही का? या मेकअप टिप्स करतील मदत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makeup Tips: डार्क ओठांवर हलक्या रंगाची लिपस्टिक लावता येत नाही का? या मेकअप टिप्स करतील मदत

Makeup Tips: डार्क ओठांवर हलक्या रंगाची लिपस्टिक लावता येत नाही का? या मेकअप टिप्स करतील मदत

Published Jul 20, 2024 07:26 PM IST

Dark Pigmented Lips: आजकाल न्यूड आणि लाइट लिपस्टिक शेड्स खूप ट्रेंडी आहेत. पण जर तुमचे ओठ थोडे काळे असतील तर ते तुमच्या ओठांना अजिबात अप्लाय होत नाहीत. आज आम्ही तुम्हाला ते लावण्याची ट्रिक सांगणार आहोत.

डार्क ओठांवर हलक्या रंगाची लिपस्टिक लावण्यासाठी मेकअप टिप्स
डार्क ओठांवर हलक्या रंगाची लिपस्टिक लावण्यासाठी मेकअप टिप्स (Freepik)

Tips to Apply Light Colour Lipstick on Dark Lips: मेकअपमध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे झाले तर ती म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिकशिवाय कितीही चांगला मेकअप केला तरी तो अपूर्ण वाटतो. फॅशन ट्रेंडनुसार लिपस्टिकच्या शेड्सही बदलतात. हल्ली लाइट शेड्स, न्यूड कलर्स आणि ग्लासी लिप टिंट खूप ट्रेंडमध्ये आहेत. पण अनेक मुलींच्या ओठांचा रंग थोडा डार्क असल्याने त्यांना हे शेड्स ट्राय करता येत नाही. कारण त्यांच्या ओठांवर हलके शेड्स नीट दिसत नाही. तुम्हालाही हीच समस्या असेल तर टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. आज आम्ही तुमच्यासाठी काही मेकअप टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने अगदी हलकी न्यूड शेडसुद्धा तुमच्या पिगमेंटेड ओठांना सूट करेल.

लिप्सला हायड्रेट करणे खूर गरजेचे

पिगमेंटेड ओठांवर लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना हायड्रेट करणं खूप गरजेचं आहे. फाटलेल्या ओठांवर लिपस्टिकचा रंग अधिक दाबला जातो. त्यामुळे लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना थोडे व्हॅसलीन, लिप बाम किंवा खोबरेल तेल लावावे. आपल्या ओठांना थोडा वेळ मसाज करा. यामुळे लिपस्टिकसाठी स्मूथ बेस तयार होईल. आता टिश्यूच्या मदतीने अतिरिक्त लिप बाम किंवा तेल काढून टाका.

कंसीलरने डार्कनेस करा कंसील

पिगमेंटेड लिप्सवर डार्कनेसमुळे हलक्या न्यूड शेड्सचा कलर अजिबात दिसत नाही. त्यामुळे आधी हा डार्कनेस लपवणं गरजेचं ठरतं. यासाठी तुम्ही कंसीलरचा वापर करू शकता. कंसीलरच्या साहाय्याने ओठांवर एक लेअर तयार करा आणि ते चांगले ब्लेंड करा. यामुळे तुमच्या ओठांचा डार्कनेस पूर्णपणे कव्हर होईल.

लिप लाइनर करेल मदत

कंसीलनरचे ओठांचा डार्कनेस कंसील केल्यानंतर आता लिप लाइनरची पाळी येते. आपण ज्या प्रकारच्या लिपस्टिक लावणार आहात त्यापासून एक शेड डार्क लिप लाइनर वापरा. लिप लाइनरच्या मदतीने आपल्या ओठांना नीट आउटलाइन करून घ्या. यामुळे तुमच्या लिपस्टिकचा रंग अधिक चमकदार होईल. यानंतर त्यावर तुमची आवडती लिपस्टिक लावा. आता तुम्हाला दिसेल की अगदी हलक्या रंगाची न्यूड लिपस्टिकसुद्धा तुमच्या पिगमेंटेड ओठांवर आरामात लावली जाईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner