Laundry Hacks: वॉशिंग मशीनशिवाय मिनिटांत धुतले जातील भरपूर कपडे, ट्राय करा हे आश्चर्यकारक हॅक्स-follow these laundry hacks to wash clothes fast without washing machine ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Laundry Hacks: वॉशिंग मशीनशिवाय मिनिटांत धुतले जातील भरपूर कपडे, ट्राय करा हे आश्चर्यकारक हॅक्स

Laundry Hacks: वॉशिंग मशीनशिवाय मिनिटांत धुतले जातील भरपूर कपडे, ट्राय करा हे आश्चर्यकारक हॅक्स

Aug 10, 2024 09:59 PM IST

Clothes Washing Tips: घरातील सर्व कामांपैकी सर्वात कंटाळवाणे आणि थकवणारे काम म्हणजे कपडे धुणे. वॉशिंग मशिनशिवाय एकाच दिवशी भरपूर कपडे धुणे हे खूप चॅलेंजिंग काम आहे. आज आम्ही तुमच्यासाठी यासंबंधीचे काही भन्नाट हॅक्स घेऊन आलो आहोत.

वॉशिंग मशीनशिवाय कपडे धुण्यासाठी हॅक्स
वॉशिंग मशीनशिवाय कपडे धुण्यासाठी हॅक्स (unsplash)

Easy Way to Wash Clothes Without Washing Machine: कपडे धुणे हे सर्वात महत्वाचे काम असले तरी ते सर्वात अवघड देखील आहे. बहुतेक लोक रोज कपडे धुणे टाळतात. त्यामुळे एकाच दिवशी डोंगराप्रमाणे कपड्यांचा ढिग धुवावा लागतो. एका दिवसात घरातील सर्व कपडे धुणे हे खूप चॅलेंजिंग काम आहे. कितीही पटकन केले तरी किमान अर्धा दिवस तरी निघून जातो. जेव्हा आपण वॉशिंग मशीनचा आधार घेत असाल तेव्हा ही स्थिती आहे. वॉशिंग मशिन नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट होते. चला तर मग आज जाणून घेऊया काही मजेदार हॅक्स ज्यांच्या मदतीने तुम्ही मिनिटात या तासाचे काम संपवू शकता.

कपड्यांचा सिलेक्शन करा

कपडे वेगाने धुण्याची पहिली स्टेप म्हणजे त्यांचे वर्गीकरण करणे. अनेकदा एकत्र धुतल्यानंतर कपड्यांची साफसफाई नीट होत नाही आणि मध्ये मध्ये वेगळे करायला बराच वेळ लागतो. त्यामुळे ते आधीच करून घेणं चांगलं. यासाठी रंगीत कपड्यांपासून पांढरे कपडे वेगळे करावेत. यासोबतच ज्या कपड्यांचा रंग सुटत असेल ते कपडे अगोदरच करा. आता दोन वेगवेगळ्या बादलीत गरम पाणी घ्या. कपडे धुण्यासाठी गरम पाणी योग्य आहे.

धुण्यापूर्वी भिजवायला विसरू नका

कपडे पटकन धुवायचे असतील तर ते भिजवायला अजिबात विसरू नका. असे केल्याने कपड्यांची घाण फुलते आणि धुतल्यावर सहज दूर होते. कपडे कोमट पाण्यात भिजवण्याचा प्रयत्न करा. अगदी घाणेरडे कपडे सुद्धा गरम पाण्यामुळे सहज साफ होतात. डिटर्जंट गरम पाण्यात विरघळून घ्या आणि कपडे सुमारे १० मिनिटे भिजण्यासाठी सोडा. यानंतर एक-एक करून कपडे काढून हलक्या हातांच्या किंवा ब्रशच्या साहाय्याने चोळावे. आता ते थंड पाण्याने चांगले धुवून बाहेर काढा.

या गोष्टी लक्षात ठेवा

कपडे धुताना काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर कपडे धुणे सोपे होईल आणि वेळेचीही बचत होईल. अनेकदा बाथरूम घाण झाल्यामुळे कपड्यांवर डाग पडतात. त्यामुळे नेहमी बाथरूम नीट स्वच्छ करा आणि मग कपडे धुण्यासाठी बसा. रंग सोडणारे कपडे नेहमी शेवटी धुवावे. कपडे वाळवताना कोरडे पांढरे आणि रंगीत कपडे वेगळे वाळवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग