Tips to Store Wheat flour or Multigrain Atta: थंडीच्या काळात सुद्धा अनेक वेळा स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तू खराब होण्याची भीती असते. या ऋतूतही घरात थंडी आणि ओलसरपणा असतो आणि सूर्यप्रकाशाचा अभाव असतो. अशा परिस्थितीत काही वेळा डब्यात ठेवलेले गव्हाचे पीठ, मैदा, रवा इत्यादींवर किडींचा प्रादुर्भाव होतो. पीठाच्या डब्यात किडे आणि जाळे होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी उर्मिला सिंह यांनी काही काही स्टोरेज टिप्स सांगितल्या आहेत.
- पीठ नेहमी हवाबंद डब्यात ठेवा. जेव्हा ओलावा पिठात पोहोचतो तेव्हाच कीटक किंवा अळ्या त्याचा प्रादुर्भाव करू लागतात. ओलावा किंवा हवेपासून संरक्षण करण्यासाठी पीठ स्टील किंवा प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवा.
- मिठाच्या चवीमुळे पिठात किडींचा प्रादुर्भाव सहजासहजी होत नाही. अशा स्थितीत मीठाचे मोठे तुकडे पिठात ठेवा.
- माचिसच्या काडीत सल्फर असते, जे पिठात कोणत्याही प्रकारचे कीटक वाढण्यास प्रतिबंध करते. माचिसच्या डब्यात काही काड्या टाका, ते थोडं उघडं ठेवा आणि पीठ असलेल्या डब्यात ठेवा.
- हिंगाचे मोठे तुकडे कापडात बांधून पोटली बनवा आणि पिठाच्या डब्यात ३-४ पोटली ठेवा. हिंगाचा तीव्र वास आणि सुगंध पिठात कीटक येण्यापासून रोखेल.
- रिकाम्या माचिसच्या बॉक्समध्ये काळी मिरी आणि कापूर भरा. तो बॉक्स थोडासा उघडा आणि पिठाच्या डब्यात ठेवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या