Hacks to Prevent Iron Pan From Rusting: लोखंडी कढईत अन्न शिजवल्याने अनेक आश्चर्यकारक आरोग्य फायदे मिळतात. असे केल्याने शरीरातील लोहाची कमतरता तर दूर होतेच पण शरीरातील थकवा, अशक्तपणा आणि दुखण्यापासूनही आराम मिळतो. पण लोखंडी भांड्यात स्वयंपाक केल्यावर बहुतेक महिलांना भेडसावणारी समस्या म्हणजे ती खूप लवकर गंजू लागते. त्यामुळे अनेक वेळा लोक लोखंडी भांडी वापरणे टाळतात आणि त्याचे फायदे पूर्णपणे मिळवू शकत नाहीत. तुम्हीही लोखंडी भांडी गंजण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर शेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि तुमची समस्या सोडवण्यासाठी टिप्स शेअर केल्या आहेत. या हॅक्सच्या मदतीने तुम्ही लोखंडी भांडी गंजण्यापासून वाचवू शकता. जाणून घ्या या सोप्या टिप्स.
लोखंडी भांडींवर गंजाचे ठसे पडू नयेत म्हणून प्रथम ती नीट धुवून स्वच्छ करा. यानंतर त्यांना सुती कापडाने पूर्णपणे पुसून टाका आणि वाळवा.
लोखंडाचे भांडे धुवून कोरडे केल्यानंतर त्यात मोहरीचे तेल टाका. भांड्यात ओतलेले हे तेल सर्व भांड्यात चांगले पसरवून लावावे.
आता या स्टेपवर तेल लावलेले लोखंडी भांडे दुसऱ्या सुती कापडाने पुसून स्वच्छ करा. असे केल्याने तुमची लोखंडी भांडी कधीच गंजणार नाहीत.
- लोखंडी तवा नेहमी सौम्य डिटर्जंटने धुवा आणि लगेच पुसून टाका.
- कढईवर थोडे तेल लावल्यास गंजण्यापासून बचाव होतो.
- लोखंडी कढईत आंबट पदार्थ शिजवू नका.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या