मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Hacks: जेवण पॅक केल्यानंतर ॲल्युमिनियम फॉइल फेकून देता? रियूज करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Kitchen Hacks: जेवण पॅक केल्यानंतर ॲल्युमिनियम फॉइल फेकून देता? रियूज करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 02, 2024 09:02 PM IST

Reuse Tips: अॅल्युमिनियम फॉइल वापरल्यानंतर ते फेकून दिले जाते. पण तुम्ही हे पुन्हा वापरू शकता. कसे ते जाणून घ्या.

ॲल्युमिनियम फॉइलचा पुन्हा वापर करण्यासाठी टिप्स
ॲल्युमिनियम फॉइलचा पुन्हा वापर करण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Reuse Aluminum Foil: बहुतांश घरामध्ये अॅल्युमिनियम फॉइलचा वापर विविध प्रकारे केला जातो. पोळी, पराठी पॅक करणे असो किंवा भाज्या आणि नॉनव्हेज ग्रिलिंगसाठी सुद्धा हे वापरले जाते. अॅल्युमिनियम फॉइल वापरल्याने अन्न गरम राहते. पण अनेकदा हे फॉइल वापरल्यानंतर ते फेकून दिले जाते. तुम्ही सुद्धा आतापर्यंत असे करत असाल तर हे वाचून तुम्ही असे करणार नाही. वापरलेल्या अॅल्युमिनियम फॉइलचा पुन्हा वापर करता येतो. कसे ते तेथे जाणून घ्या.

अॅल्युमिनियम फॉइल पुन्हा वापरण्यासाठी टिप्स

गॅसचे गंज साफ करण्यासाठी

अॅल्युमिनियम फॉइल वापरल्यानंतर ते गॅसचे गंज साफ करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. जर तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेला गॅस गंजला असेल तर ते साफ करण्यासाठी फॉइलचा स्क्रबर म्हणून वापर केला जाऊ शकतो. यासाठी थोडासा बेकिंग सोडा घ्या आणि पाण्यात विरघळवा. आता अॅल्युमिनियम फॉइल बेकिंग सोडा पाण्यात बुडवा आणि त्याने गॅस स्वच्छ करा. तुमचा गॅस एकदम नवीनसारखा चमकेल.

मिक्सर जार साफ करण्यासाठी

मिक्सर जारचे ब्लेड साफ करणे थोडे अवघड काम आहे. अशा परिस्थितीत अॅल्युमिनियम फॉइल तुम्हाला मदत करू शकते. यासाठी वापरलेल्या अॅल्युमिनियम फॉइलचे तुकडे कापून कोरड्या मिक्सर जारमध्ये ठेवा. नंतर मिक्सरचे झाकण बंद करा आणि काही वेळ मिक्सर चालवा. तुमचा मिक्सर जार एकदम साफ दिसेल.

झाडे, रोपे हिरवीगार ठेवण्यासाठी

तुमच्या अंगणातील हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही अॅल्युमिनियम फॉइलचा पुनर्वापर करू शकता. अनेक वेळा प्रखर सूर्यप्रकाशामुळे झाडे लवकर सुकायला लागतात किंवा कीटकांमुळे नष्ट होतात. अशा परिस्थितीत झाडे सुरक्षित आणि हिरवीगार ठेवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जाऊ शकतो. हा उपाय करण्यासाठी रोपांच्या देठांवर अॅल्युमिनियम फॉइल गुंडाळा. रोपे हिरवीगार ठेवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल उपयुक्त आहे.

दागिने स्वच्छ करण्यासाठी

तुम्ही दागिने स्वच्छ करण्यासाठी सुद्धा अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करू शकता. हा उपाय करण्यासाठी एका भांड्यात गरम पाण्यासोबत बेकिंग सोडा टाका आणि त्यात तुमचे दागिने टाका. नंतर अॅल्युमिनियम फॉइलच्या मदतीने तुमचे दागिने स्वच्छ करा.

 

चाकूला धार करण्यासाठी

चाकूला धार करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करु शकता. यासाठी फॉइल पेपर दोन-तीन वेळा फोल्ड करून त्यावर चाकूने घासा. असे केल्याने चाकूची धार तीक्ष्ण होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel