Home Remedies: तळलेले, मसालेदार खाल्ल्याने पोट खराब झाले? या घरगुती उपायांनी लगेच वाटेल बरे-follow these home remedies for quick recovery from upset stomach during festive season ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Home Remedies: तळलेले, मसालेदार खाल्ल्याने पोट खराब झाले? या घरगुती उपायांनी लगेच वाटेल बरे

Home Remedies: तळलेले, मसालेदार खाल्ल्याने पोट खराब झाले? या घरगुती उपायांनी लगेच वाटेल बरे

Nov 15, 2023 10:49 PM IST

Festive Season Health Care: सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. दिवाळीच्या दिवसात रोज वेगवेगळे तळलेले, मसालेदार पदार्थ खाल्ले जातात. अशा वेळी जर तुमचे पोट खराब होत असेल तर हे उपाय करा.

पोट खराब झाल्यावर आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
पोट खराब झाल्यावर आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय (unsplash)

Home Remedies for Upset Stomach: सणासुदीच्या काळात प्रत्येक घरात अनेक तळलेले, मसालेदार पदार्थ तयार केले जातात. अशा परिस्थितीत असे अन्न खाल्ल्यानंतर अनेकांचे पोट बिघडते. त्यामुळे पोटात दुखणे, पोट खराब होणे आणि जुलाब किंवा उलट्या सारख्या परिस्थिती देखील उद्भवू शकतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. यामुळे पोटदुखी आणि पोटातील गडबड कमी होण्यास मदत होते.

दही खा

दही खाल्ल्याने अनेक समस्या दूर होतात. दह्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे पोटातील बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन कमी होते. पोटदुखी झाल्यास दह्यात पाणी मिसळून ते पातळ करून ताक बनवावे. त्यात मीठ आणि जिरेपूड टाकून ते प्यावे. हे उत्तम उपाय आहे.

नारळ पाणी फायदेशीर

पोट खराब झाल्यास पाण्याची कमतरता असते. अशा परिस्थितीत तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. याचे इलेक्ट्रोलाइट्स तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतात आणि डिहायड्रेशनची लक्षणे देखील कमी करतात. पोट बिघडल्यास नारळ पाणी प्या.

केळी खा

पोट खराब झाल्यास केळी खाणे चांगले असते. केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण स्नायूंचे आकुंचन दूर करते. याशिवाय केळी हलकी असतात आणि पचायलाही सोपी असते. पोट बिघडल्यास केळी खावी. ते जास्त पिकलेले नसावे हे लक्षात ठेवा.

 

साखर खाऊ नका

साखर आतड्यात प्रवेश करू शकते आणि तेथे आधीपासूनच असलेल्या संवेदनशील जीवाणूंवर परिणाम करू शकते. पोटदुखीच्या बाबतीत ज्यूस आणि जास्त गोड फळे खाणे टाळावे. जुलाबात आर्टिफिशियल स्वीटनर सुद्धा घेऊ नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)